Saturday, May 18, 2024
Homeनाशिकऊसतोडणी दरामध्ये वाढ करा : आ. धस

ऊसतोडणी दरामध्ये वाढ करा : आ. धस

नांदगाव। प्रतिनिधी Nandgaon

यंदाचा पाणी पाऊस चांंगला आहे. ऊसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर आहे.

- Advertisement -

लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी ऊसतोडणी दरामध्ये वेळोवेळी वाढ केली होती. यावेळी संघटनेच्या वतीने दिडशे टक्क्यांनी वाढ मिळाल्या शिवाय मुकादमांनी गावे सोडू नका, असा इशाराही विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस यांनी नांदगांव येथे गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी मजूर, मुकादम संघटनेच्या बैठकीमध्ये मार्गदर्शन करतांंना ते बोलत होते.

पुढे बोलताना आमदार धस म्हणाले की,स्वर्गीय गोपीनाथ मुढे यांनी या मजुरांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली. ऊसतोडणी दरांमध्ये पहिले 25 टक्के, दुसर्‍या वेळी 35 टक्के आणि तिसर्‍या वेळी 70टक्के वाढ केली आहे. वर्षानुवर्षे साखर कारखानदारांनी ऊसतोडणी मजूरांच्या घामावर करोडो रुपयांचे इमले उभे केले आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातील या कारखानदारांनी मंजूरांची, मुकादमांची पिळवणूक केली आहे. साखर कारखांंचा नफा आणि ऊसतोडणी मंजूर आणि मुकादम, वाहतूकदार यांना मिळणारे पैसे यांचा हिशोब करण्याची वेळ आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी तांदूळ व गव्हाची सोय केली आहे. सध्याचा ऊसतोडीचा दर हा किमान वेतन कायद्याप्रमाणे मिळणार्‍या मजुरीच्या अर्धाच आहे. त्यामुळे दिडशे टक्के वाढ मिळावी अशी आपली मागणी आहे.

सुरुवातीपासून आपण ऊसतोड मंजूरांच्या बाजूने भक्कमपणे उभे आहोत. प्रतिटन एक हजार रुपये भाव मिळालाच पाहिजे.ऊसतोडी मजूर काबाड कष्ट करून मोबदला मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ऊसतोडी मजूर उचल घेऊन पळून जातात.

त्यामुळे मुकादमांना संरक्षण द्या, कारण पैसे जाऊन आत्महत्येची वेळ मुकादमांवर येत असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत अनेक मुकादमांनी आपले जीवन संपवले आहे. व्यासपीठावर शिवसेनेचे तालुकाध्यक्ष किरण देवरे,प्रमोद भाबड, सुभाष कुटेसह नांदगाव तालुका गोपीनाथराव मुंडे ऊसतोडणी मजूर,मुकादम संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या