Saturday, July 27, 2024
Homeनाशिकनांदूरमध्यमेश्वर धरणातून विसर्ग वाढवला

नांदूरमध्यमेश्वर धरणातून विसर्ग वाढवला

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या महिनाभरापासून दडी मारुन बसलेल्या पावसाने गुरुवारपासून जोरदार हजेरी लावल्याने अनेक नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत…

- Advertisement -

नांदूरमधमेश्वर धरणातून आज 8 सप्टेंबर रोजी दुपारी 12.00 वाजता 100 क्यूसेसने विसर्ग सरू होता. तो आता 200 क्यूसेसने वाढवण्यात आला आहे. नांदूरमध्यमेश्वर धरणातून एकूण 300 क्यूसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.

Video : त्र्यंबकेश्वरला धो-धो पाऊस; धबधबे वाहू लागले, मनमोहक दृश पाहा इथे

दरम्यान, गंगापूर धरणातून आज दुपारी ५०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर राहिल्यास विसर्ग टप्याटप्याने वाढवण्यात येईल, अशीही माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Video : पावसाचा घाट, स्मार्ट सिटीने लावली नाशिककरांची वाट

- Advertisment -

ताज्या बातम्या