Sunday, November 17, 2024
Homeब्रेकिंग न्यूजDeshdoot Panchavati Property Expo : देशदूत 'पंचवटी प्रॉपर्टी एक्स्पो'ला वाढता प्रतिसाद

Deshdoot Panchavati Property Expo : देशदूत ‘पंचवटी प्रॉपर्टी एक्स्पो’ला वाढता प्रतिसाद

उद्या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस

नाशिक । प्रतिनिधी Nashik

युवकांपासून व्यावसायिक आणि ज्येष्ठ नागरिकांपासून महिलांपर्यंत विविध श्रेणीतील नागरिकांच्या भेटीचा ओघ हे ‘हर्षल हणमंते बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रा. लि.’ प्रायोजित ‘देशदूत पंचवटी प्रॉपर्टी एक्स्पो’च्या दुसऱ्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. शनिवारची (दि.१६) सायंकाळ स्वप्नातील घराच्या शोधात घालवून पंचवटीकरांनी ‘वीकएण्ड’चा पुरेपूर आनंद घेतला.

- Advertisement -

‘देशदूत’ आयोजित ‘प्रॉपर्टी एक्स्पो’त सहभागी बांधकाम व्यावसायिकांचे प्रकल्प मध्यमवर्गीयांपासून उच्च मध्यमवर्गीयांपर्यंत सर्वच घटकांना सुयोग्य पर्याय उपलब्ध करून देत आहेत. नागरिक सहकुटुंब गर्दी करीत आहेत. दुपारी 2 वाजेपासून सुरू झालेला गर्दीचा ओघ रात्री ९ पर्यंत सुरू होता. स्टॉलधारकांकडून प्रदर्शनात आलेल्या कुटुंबीयांना पूरक माहिती देण्यात आली.

पंचवटी परिसरातील घरांचे पर्याय प्रत्यक्ष डोळ्यांत साठवता यावेत या उद्देशाने काही सहभागी बांधकाम व्यावसायिकांनी प्रत्यक्ष ‘साईट व्हिजिट’ची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. काल आलेल्या अनेक ग्राहकांनी आज प्रत्यक्ष साईटवर पाहणी केली. तसेच आज आलेले ग्राहक उद्या साईट व्हिजिट करणार आहेत. अनेक जण घर घेण्यास अनुकूल आहेत. उद्या दि.१७ नोव्हेंबर रोजी या प्रदर्शनाचा समारोप होणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी दुपारी 2 ते रात्री ९ या वेळेत प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले.

मान्यवरांच्या भेटी
क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील, क्रेडाई मानद सचिव गौरव ठक्कर, क्रेडाई पदाधिकारी मनोज खिवंसरा, श्रेणीक सुराणा, नावाचे अध्यक्ष प्रवीण चांडक, दिलीप निकम, म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके, जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घावरे, व्यवस्थापक मिलिंद वैद्य, समीर पाराशरे आदी.

‘देशदूत’ प्रॉपर्टी एक्स्पोचे मुख्य प्रायोजक नाशिककरांचे ३७ वर्षांपासून असलेले फॅमिली बिल्डर प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक हर्षल हणमंते बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रा. ली. हे आहेत. तसेच फायनान्शिअल पार्टनर बँक ऑफ महाराष्ट्र आहे. तर पर्यावरणीय पार्टनर पपायाज नर्सरी हे आहेत. दुपारी 2 ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वांना प्रवेश खुला आहे. नागरिकांनी ‘देशदूत’ आयोजित पंचवटी प्रोपर्टी एक्स्पोला अवश्य भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या