मेलबर्न –
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये सुरु असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसर्या दिवशी कर्णधार अजिंक्य रहाणे
याने नाबाद शतक झळकावले आहे. गेल्या काही सामन्यांत अजिंक्यला सूर गवसत नव्हता, ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यातही अजिंक्य आपली छाप पाडण्यात अपयशी ठरला होता. मात्र विराट कोहली माघारी परतल्यानंतरही अजिंक्यने आपली जबाबदारी योग्य पद्धतीने सांभाळत शतक झळकावून पहिल्या डावात संघाला आघाडी मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. अजिंक्यनं 196 चेंडूंत 11 चौकारांच्या मदतीनं शतक पूर्ण केलं.
कसोटी क्रिकेटमधलं अजिंक्य रहाणेचं हे 12 वं शतक ठरलं. महत्वाची गोष्ट म्हणजे दुसर्या दिवसाच्या खेळात अजिंक्यने हनुमा विहारी, ऋषभ पंत आणि रविंद्र जाडेजा यांच्यासोबत महत्वपूर्ण भागीदारी करत भारतीय संघाला आघाडी मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. हनुमा विहारीसोबत भागीदारी करताना सावध पवित्रा घेऊन खेळणार्या अजिंक्यने ऋषभ पंत फलंदाजीला आल्यानंतर आक्रमक फलंदाजी करत संघाची धावगती वाढवण्यात मोलाची भूमिका बजावली.