Tuesday, November 26, 2024
Homeक्रीडाIND vs AUS 3rd Test : ऑस्ट्रेलियाकडे १९७ धावांची आघाडी

IND vs AUS 3rd Test : ऑस्ट्रेलियाकडे १९७ धावांची आघाडी

दिल्ली | Delhi

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीत तिसरी कसोटी सुरू आहे. या सामन्याचा तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. सध्या ऑस्ट्रेलिया १९७ धावांनी आघाडीवर आहे.

- Advertisement -

या सामन्यात तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २९ षटकात २ बाद १०३ धावा केल्या आहेत. तसेच १९७ धावांनी ऑस्ट्रेलिया सध्या आघाडीवर आहे. मार्नस लॅब्यूशाने आणि स्टिव्ह स्मिथ या दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिली विकेट पुकोस्कीच्या रुपात ६ व्याच षटकात गमावल्यानंतर आर अश्विनने डेविड वॉर्नरलाही स्वस्तात बाद केले. त्याने १० व्या षटकात वॉर्नरला पायचित केले. मात्र वॉर्नरने डीआरएस रिव्ह्यू घेतला. पण हा रिव्ह्यू भारताच्या बाजूने लागल्याने वॉर्नरला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. वॉर्नर २९ चेंडूत १३ धावा करुन बाद झाला.

यानंतर मात्र मार्नस लॅब्यूशाने आणि स्टिव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. त्यांनी तिसऱ्या दिवसाखेरपर्यंत आणखी विकेट जाऊ दिली नाही. या दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी तिसऱ्या दिवसाखेरपर्यंत ६८ धावांची नाबाद भागीदारी रचली आहे. तिसऱ्या दिवसाखेर स्मिथ २९ धावांवर आणि लॅब्यूशाने ४७ धावांवर नाबाद आहे.

दरम्यान, तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणे लगेच बाद झाला. त्यानंतर भारतीय संघाचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. चांगल्या सुरुवातीनंतरही फलंदाजांनी केलेल्या हराकिरीमुळे भारतीय संघाचा पहिला डाव २४४ धावांवर आटोपला. चेतेश्वर पुजारा (५०) आणि शुबमन गिल (५०) यांचा अपवाद वगळता एकाही भारतीय फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. रोहित शर्मा (२६), अजिंक्य रहाणे (२२) आणि ऋषभ पंत (३६) यांना चांगल्या सुरुवातीनंतर मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. रविंद्र जाडेजानं अखेरीस काही अप्रतिम फटके मारत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. जाडेजानं नाबाद २८ धावांची खेळी केली.

भरातीय फलंदाजांनी हराकिरी केल्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यावर ऑस्ट्रेलिया संघानं वर्चस्व मिळवलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघानं अफलातून क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन केलं. कांगारुंनी भारताच्या तीन फलंदाजांना धावबाद केलं. यामध्ये हनुमा विहारी(४), आर. अश्विन (१०)आणि जसप्रीत बुमराह (००) यांचा समावेश आहे. पहिल्या डावात फलंदाजी करताना यष्टीरक्षक ऋषभ पंत आणि अष्टपैलू रविंद्र जाडेजाला दुखपत झाली आहे. दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षणासाठी दोघेही मैदानात उतरले नव्हते. जाडेजाच्या जागी मयांक अगरवाल आणि पंतच्या जागी वृद्धीमान साहा क्षेत्ररक्षणासाठी उतरले होते. स्कॅन केल्यानंतर पंत-जाडेजा यांच्या दुखापतीबाबत समजले. याआधी इशांत, शमी, केएल. राहुल आणि उमेश यादव दुखापतीमुळे कसोटी मालिकेला मुकले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या