Friday, July 12, 2024
Homeमुख्य बातम्याICC World Cup 2023 : ऑस्ट्रेलिया जगज्जेते; 'टिम इंडिया'चा दारूण पराभव !

ICC World Cup 2023 : ऑस्ट्रेलिया जगज्जेते; ‘टिम इंडिया’चा दारूण पराभव !

अहमदाबाद | Ahmedabad

- Advertisement -

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला आहे. या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले होते. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात भारताचा 6 गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर विक्रमी सहाव्यादा एकदिवसीय विश्वचषकावर नाव कोरले. ऑस्ट्रेलियासाठी ट्रॅव्हिस हेडने शतक झळकवले.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित असताना टीम इंडियाने 50 षटकांत 240 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने 43 षटकात 4 विकेट गमावत 241 धावा करत सामना जिंकला. कांगारू संघासाठी ट्रॅव्हिस हेडने 141 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. लॅबुशेनने नाबाद 58 धावा केल्या. मिचेल मार्श 15 धावा केल्यानंतर, डेव्हिड वॉर्नर सात धावा करून, स्टीव्ह स्मिथ चार धावा करून बाद झाला. ग्लेन मॅक्सवेलने नाबाद 2 धावा केल्या.अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ 240 धावांत ऑलआऊट झाला आहे. कांगारू संघाने विजयासाठी 241 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक 66 आणि विराट कोहलीने 54 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने 47 आणि सूर्यकुमार यादवने 18 धावा केल्या. कुलदीप यादवने 10 धावांचे योगदान दिले.या पाच खेळाडूंशिवाय कोणीही दुहेरी आकडा गाठू शकला नाही. रवींद्र जडेजा नऊ, मोहम्मद शमी सहा, श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल प्रत्येकी चार धावा करून बाद झाले. जसप्रीत बुमराहला एकच धाव करता आली. मोहम्मद सिराज नऊ धावा करून नाबाद राहिला.ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांना प्रत्येकी दोन यश मिळाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या