Friday, April 25, 2025
Homeक्रीडाIND vs AUS : ॲडलेडमध्ये टीम इंडिया १८० धावांवर ऑलआऊट, एकट्या मिचेल...

IND vs AUS : ॲडलेडमध्ये टीम इंडिया १८० धावांवर ऑलआऊट, एकट्या मिचेल स्टार्कचे ६ बळी

ॲडलेड । Adelaide

भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. पहिला सामना पर्थमध्ये रंगला तर आता दुसरा समना हा ॲडलेडमध्ये रंगतोय. ॲडलेड कसोटीत भारताचे नेतृत्व कर्णधार रोहित शर्मा करत आहे तर नाणेफेक जिंकून त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

मात्र टीम इंडियाला सामन्यातील पहिल्या दिवशी पहिल्या डावात २०० पारही पोहचता आलं नाही. काही फलंदाजांचा अपवाद वगळता इतर सर्व अपयशी ठरले. मात्र नितीश रेड्डी याने अखेरच्या क्षणी केलेल्या खेळीमुळे भारताला १५० मार मजल मारता आली.

मिचेल स्टार्क याने आपल्या धारदार बॉलिंगच्या जोरावर ६ विकेट्स घेत भारताला १८० धावांवर गुंडाळलं. मिचेल स्टार्कने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या. स्टार्कच्या कारकीर्दीतील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. तर टीम इंडियासाठी नितीशने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. नितीशने ४२ धावांची खेळी केली.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिवस-रात्र कसोटी सामन्यात एखाद्या संघाला २०० धावांचा टप्पा गाठता आला नाही, अशी ही पहिलीच वेळ आहे. आत्तापर्यंत, ऑस्ट्रेलियाविरुद्ध पिंक बॉल कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात २०२, २५९/९ आणि २४४ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने इथे पहिल्या डावात ४४२/८, ५८९/३, ४७३/९ आणि ५११/७ धावा केल्या आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...