Saturday, May 4, 2024
Homeक्रीडाIND vs AUS : आजपासून रंगणार भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेचा थरार

IND vs AUS : आजपासून रंगणार भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेचा थरार

मोहाली | Mohali

भारतात येत्या ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर महिन्यामध्ये आयसीसी वनडे क्रिकेट वर्ल्डकप (ICC ODI World Cup) होणार आहे. या महत्वपूर्ण स्पर्धेसाठी आपली मजबूत तयारी करण्यासाठी भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) क्रिकेट संघांमध्ये ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे…

- Advertisement -

भारतीय संघाचे कर्णधारपद लोकेश राहुलकडे असणार आहे. तर रविंद्र जडेजा उपकर्णधार असणार आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे कर्णधापद पेट कमिन्स सांभाळणार आहे. मालिकेतील पहिला सामना मोहाली येथील आय एस बिंद्रा मैदानावर होणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण जिओ सिनेमा आणि स्टार स्पोर्ट्स वाहिनी वर करण्यात येणार आहे.

ठाकरे गटाचे लक्ष आता विधान परिषदेतील आमदारांकडे; सुप्रिम कोर्टात त्या आमदारांविरोधात याचिका दाखल करणार?

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वात विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाला पराभवाचा धक्का देऊन आयसीसी वनडे क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत आत्मविश्वासाने सहभागी होण्यासाठी सज्ज असणार आहे.

तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाला दक्षिण आफ्रिका विरुद्ध झालेल्या ५ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ३-२ असा पराभव स्वीकारावा लागला होता. हा पराभव मागे सारून विजयी मार्गावर परतण्यासाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सज्ज झाला आहे.

सुजय विखे पाटलांची लोकसभेत फुल्ल बॅटिंग, शेरोशायरी करत विरोधकांना चिमटे… पाहा VIDEO

‘देशदूत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघासाठी जमेची बाजू म्हणजे पेट कमिन्स, मिचेल स्टार्क, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल संघात दुखापतीवर मात करून परतले आहेत. या मालिकेतून दोन्ही संघांना आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी आपलीं सर्वोत्तम इलेव्हन निवडण्याची संधी मिळणार आहे.

सामन्याचे समालोचन हिंदी, इंग्रजी भाषेत स्टार स्पोर्ट्स वाहिनी वर करण्यात येणार आहे.तर मराठी समालोचन जिओ सिनेमा वर करण्यात येणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० वाजता खेळवण्यात येणार आहे.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने फेब्रुवारी २०२३ मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा दौरा केला होता.या दौऱ्यात झालेल्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय क्रिकेट संघाने २-१ ने मालिकेत पराभव स्वीकारला होता.या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाला संधी मिळणार आहे.

दोन्ही संघांमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीत प्रचंड विविधता असल्याने मालिकेत एकमेकांना कडवी लढत देण्याचा दोन्ही संघांचे प्रयत्न असणार आहेत.

एकूण एकदिवसीय सामने २६, प्रथम फलंदाजी करताना संघ विजयी १५ .

दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ विजयी ११ .

पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या २६५ .

सर्वाधिक धावसंख्या भारत ३९२-४ विरुद्ध श्रीलंका.

पहिला वनडे सामना भारत विरुद्ध विंडीज.

अखेरचा सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया .

सलिल परांजपे नाशिक.

आमदार अपात्र प्रकरण : विधानसभा अध्यक्ष दिल्लीला रवाना; संजय शिरसाटांनी सांगितलं कारण, म्हणाले…

- Advertisment -

ताज्या बातम्या