Monday, May 4, 2026
Homeक्रीडाIND vs AUS T20 : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज टी २० मालिकेतील अखेरचा...

IND vs AUS T20 : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज टी २० मालिकेतील अखेरचा सामना; बुमराहला इतिहास रचण्याची संधी

मुंबई | Mumbai

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India and Australia) यांच्यात ५ टी २० सामन्यांची मालिका खेळविण्यात येत आहे. या मालिकेत भारतीय संघाने (Team India) २-१ ने विजयी आघाडी घेतली आहे. त्यानंतर मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना आज (शनिवारी) ब्रिस्बेन येथील गॅबा स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी १:४५ वाजता खेळविण्यात येणार आहे.

- Advertisement -

भारतीय संघाचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे (Suryakumar Yadav) असणार आहे. तर मिचेल मार्शकडे ऑस्ट्रेलिया संघाची धुरा असणार आहे. मालिकेच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी ही लढत अतिशय महत्त्वाची असणार आहे. या सामन्यात विजय संपादन करून सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली आणखी एक मालिका खिशात टाकण्यासाठी भारतीय संघाचा इरादा असणार आहे. तर या सामन्यात विजय संपादन करून मालिकेत बरोबरी साधण्याची संधी ऑस्ट्रेलियाकडे असणार आहे.

दरम्यान, या मैदानावरील (Ground) सर्वाधिक धावसंख्या २०९ ही ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील आहे. तर नीचांकी धावसंख्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातचं आहे. तसेच सर्वाधिक वैयक्तिक धावा डेमियन मार्टिन आणि बेस्ट बाॅलिंग फीगर मिचेल स्टार्कचे रेकॉर्ड आहे. याशिवाय सर्वाधिक बळी अॅडम झम्पा आणि टी २० सामन्यातील सर्वाधिक वैयक्तिक धावा डेव्हिड वाॅर्नरच्या नावावर आहे.

जसप्रीत बुमराहला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी

आजच्या सामन्यात भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bhumrah) एक खास विक्रम रचण्याची संधी आहे. जसप्रीत बुमराहने ७९ टी २० सामने खेळले असून,७७ इनिंगमध्ये ९९ गडी बाद केले आहेत. तसेच जसप्रीत बुमराह टी २० क्रिकेट सामन्यात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. ब्रिस्बेन येथील सामन्यात बुमराहने १ विकेट घेतल्यास त्याला या फाॅरमॅट मध्ये १०० बळी पूर्ण करण्याची संधी आहे. सध्या टी २० क्रिकेट सामन्यात लेफ्ट आर्म पेसर अर्शदिपसिंगने १०५ विकेट घेतल्या आहेत. बुमराहने बळींचे शतक पूर्ण केल्यास तो जलदगती गोलंदाजांच्या क्रमवारीत सहाव्या स्थानावर विराजमान होईल. सध्या या यादीत बांगलादेश संघाचा मुस्तफिझुर रहेमान पहिल्या स्थानावर आहे.जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलिया विरुद्ध १७ सामने खेळले असून, २० गडी बाद केले आहेत.

ताज्या बातम्या

Crime News : धक्कादायक! चाळीसगावात अशोक खरात सारखे प्रकरण उघड; प्रेमप्रकरणातून...

0
चाळीसगाव | मनोहर कांडेकर | Chalisgaon नाशिकसह संपूर्ण राज्यात भोंदूगिरीकरुन लोकांची फसवणूक करणारा अशोक खरातचे प्रकरण गाजत असताना तीन जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चाळीसगावातही देखील...