Tuesday, March 25, 2025
Homeक्रीडाIND vs BAN : भारत-बांगलादेश दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी माजी कर्णधाराने केली निवृत्ती...

IND vs BAN : भारत-बांगलादेश दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी माजी कर्णधाराने केली निवृत्ती जाहीर

मुंबई | Mumbai

चेन्नई येथील एम ए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटी (First Test) सामन्यात भारतीय संघाने (Team India) रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात २८० धावांनी बांगलादेशला (Bangladesh) पराभवाची धूळ चारून मालिकेत १-० ने विजयी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा निर्णायक कसोटी सामना उद्या म्हणजेच (दि.२७) सप्टेंबरपासून कानपूर येथील ग्रीनपार्क स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : मोठी बातमी! संजय राऊतांना मोठा झटका; ‘या’ खटल्यात १५ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा

मात्र, कसोटी सामना सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याने कसोटी क्रिकेट सामन्यातून निवृत्ती (Retirement) जाहीर केली आहे. भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील कसोटी मालिका आटोपल्यानंतर दक्षिण आफ्रिकाविरूध्द बांगलादेश मायदेशात कसोटी मालिका खेळणार आहे.या मालिकेत २ कसोटी क्रिकेट सामने खेळविण्यात येणार आहेत.

हे देखील वाचा : मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द; ‘हे’ आहे कारण

दक्षिण आफ्रिका विरूध्द बांगलादेश संघांमध्ये मीरपूर (Mirpur) येथील कसोटी सामना हा आपला अखेरचा कसोटी सामना असल्याचे शाकिबने स्पष्ट केले आहे.परंतु, बांगलादेश येथील सध्याची परिस्थिती पाहता ही कसोटी मालिका होणे कठीण आहे. त्यामुळे भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात कानपूर (Kanpur) येथील ग्रीनपार्क स्टेडियमवर खेळविण्यात येणारी कसोटी शाकिब अल हसनची शेवटची कसोटी ठरू शकते.

हे देखील वाचा : Political Special : राष्ट्रवादीच्या प्रचाराचे रणशिंग; शिवस्वराज्य यात्रेवेळी इच्छुकांची भाऊगर्दी

शाकिबची कसोटी कारकीर्द

शाकिबने ७० कसोटी क्रिकेट सामने खेळले असून, ४६०० धावा केल्या आहेत. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये २४२ विकेट्स देखील घेतल्या आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...