Sunday, April 12, 2026
Homeब्रेकिंग न्यूजIND vs ENG 3rd Test 2025 : आजपासून भारत-इंग्लंड तिसरा कसोटी सामना;...

IND vs ENG 3rd Test 2025 : आजपासून भारत-इंग्लंड तिसरा कसोटी सामना; बुमराहचं कमबॅक होणार?

नवी दिल्ली | New Delhi

भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात ५ कसोटी सामन्यांची (Test Serais) मालिका खेळविण्यात येत आहे. या मालिकेत भारत आणि इंग्लंड संघाने १-१ ने बरोबरी साधली आहे. त्यानंतर आता मालिकेतील तिसरा कसोटी सामना १० ते १४ जुलै दरम्यान लॉर्डस (Lords) या लंडन येथील स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी ३:३० वाजता खेळविण्यात येणार आहे.

- Advertisement -

हा सामना मालिकेच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी निर्णायक असणार आहे. या सामन्यात विजय संपादन करून विजयी आघाडी संपादन करण्यासाठी भारत आणि इंग्लंड मैदानावर (Ground) उतरणार आहेत. भारत आणि इंग्लंड संघांमध्ये १२ ते १६ ऑगस्ट २०२१ मध्ये खेळविण्यात आलेल्या अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने १५१ धावांनी दणदणीत विजय (Won) संपादन केला होता.

दरम्यान, भारतीय संघाच्या दुसऱ्या सामन्यातील विजयात आकाशदिप, शुभमन गिल, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, के एल राहुल या सर्व खेळाडूंनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात आपल्या कामगिरीमध्ये सातत्य राखण्याचे भारतीय संघासमोर आव्हान असणार आहे.

लॉर्ड्सवर चार विजय

भारतीय संघ १९३२ पासून लॉर्ड्सवर कसोटी सामने खेळत आहे, तेव्हापासून त्यांनी क्रिकेटचा मक्का म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मैदानावर १९ कसोटी सामने खेळले आहेत. परंतु भारताला त्यापैकी फक्त ३ कसोटी सामने जिंकता आले आहेत. तर १२ मध्ये पराभव पत्करावा लागला तर ४ कसोटी अनिर्णित राहिल्या आहे.

असा आहे दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड

भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत १३८ कसोटी सामने खेळले गेले आहेत. यात इंग्लंड संघाने वरचढ कामगिरी केली आहे. इंग्लंड संघाने ५२ सामने जिंकले आहेत. तर, भारताने फक्त ३६ सामने जिंकले आहेत. उर्वरित सामने अनिर्णित राहिले. पण भारताची इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यांबद्दल परिस्थिती खूप वाईट आहे. भारताने आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर फक्त १० कसोटी सामने जिंकले आहेत. तर, २२ सामने अनिर्णित राहिले आहेत.

इंग्लंडचा संघ (घोषित)

बेन स्ट्रोक्स, जो रूट, ओली पोप, हॅरी ब्रुक, बेन डकेट, जेमी स्मिथ, जेकब बेथेल, क्रिस वोक्स, जोफ्रा आर्चर, शोएब बाशीर, ब्रायडन कार्स, गस अॅटकिंसन, जॉश टंग, जेमी ओव्हरटन, सॅम कूक

भारत (संभाव्य)

यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार) करुण नायर, ऋषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, आकाशदीप, मोहम्मद सिराज/ जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा

ताज्या बातम्या

Ahilyanagar : श्रीरामपूरच्या व्यक्तीकडून नगरच्या ठेकेदाराला सव्वा तीन कोटींचा चूना

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शेअर बाजारात मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून अहिल्यानगर येथील एका तरूण कंत्राटदाराची तब्बल 3 कोटी 50 लाख 13 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक...