Tuesday, March 25, 2025
Homeक्रीडाIND vs ENG : इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

IND vs ENG : इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

मुंबई | वृत्तसंस्था | Mumbai

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात २२ जानेवारी पासून द्विपक्षीय मालिका खेळविली जाणार आहे. दौऱ्याची सुरुवात ५ सामन्यांच्या टी २० मालिकेने होणार आहे. त्यानंतर ६ फेब्रुवारी पासून ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला प्रारंभ होणार आहे. हे सामने ६,९ आणि १२ फेब्रुवारी रोजी कटक, नागपूर आणि अहमदाबाद येथे खेळविण्यात येणार आहेत. त्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

- Advertisement -

या मालिकेसाठी भारतीय संघाची धुरा रोहित शर्माकडे (Rohit Sharma) आणि उपकर्णधाराची धुरा शुभमन गीलकडे (Shubman Gill) असणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या दुखापतग्रस्त असल्याने पर्यायी खेळाडू म्हणून हर्षित राणाला संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे भारतीय संघनिवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी रोहित शर्माच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत भारतीय संघ जाहीर केला आहे.

दरम्यान,आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेला संघ आणि एकदिवसीय मालिकेसाठी (ODI series) जाहीर केलेला संघ जवळपास सारखाच आहे.तसेच विशेष म्हणजे भारतीय संघनिवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी जसप्रीत बुमराहला किमान ५ आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

भारतीय संघ खालीलप्रमाणे

रोहित शर्मा (कर्णधार) विराट कोहली, शुभमन गील (उपकर्णधार) यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, के एल राहुल, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा,अक्षर पटेल, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, अर्शदिपसिंग, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा.

सलिल परांजपे, नाशिक

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...