Friday, October 2, 2026
Homeक्रीडाIND vs NAM T20 World Cup : भारत विरुद्ध नामिबिया आज आमनेसामने;...

IND vs NAM T20 World Cup : भारत विरुद्ध नामिबिया आज आमनेसामने; प्लेइंग ११ मध्ये कुणाला मिळणार संधी?

नवी दिल्ली | New Delhi

आयसीसी पुरुष टी २० विश्वचषक स्पर्धेमध्ये (T20 World Cup) आज (गुरुवारी) भारतीय संघाचा सामना नामिबिया विरूध्द सायंकाळी सात वाजता नवी दिल्ली येथील अरूण जेटली मैदानावर होणार आहे. भारतीय संघाचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे असणार आहे. तर गेरहार्ड इरॅस्मस कडे नामिबिया संघाचे कर्णधारपद असणार आहे.

- Advertisement -

अगोदरच्या सामन्यात नामिबियाला नेदरलँड्स विरूध्द ७ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे सुपर ८ मध्ये आपले आव्हान कायम राखण्यासाठी नामिबिया संघाला विजय अनिवार्य असणार आहे. दुसरीकडे भारतीय संघाने सलामीच्या लढतीत अमेरिका संघाविरूद्ध (America Team) २९ धावांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे स्पर्धेतील आपला दुसरा विजय संपादन करण्याची संधी भारतीय संघाकडे असणार आहे.

भारत आणि नामिबियामध्ये (Ind vs Nam) आयसीसी पुरुष टी २० विश्वचषक स्पर्धेमध्ये दुबई येथे ८ नोव्हेंबर २०२१ रोजी सामना खेळविण्यात आला होता. या सामन्यात भारतीय संघाने ९ गडी राखून दणदणीत विजय संपादन केला होता. या पराभवाची परतफेड करण्यासाठी नामिबिया सज्ज असणार आहे.

या खेळाडूंवर असणार लक्ष?

भारताच्या सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्ती यांच्या कामगिरीवर लक्ष असेल. दरम्यान अभिषेक शर्मा आजारी असल्याने हा सामना खेळण्याची शक्यता कमी आहे. तर नामिबियाच्या गेरहार्ड इरॅस्मस, जे जे स्मिथ, रुबेन ट्रम्पेलमन यांच्या कामगिरीवर आली पाहिजे.

लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे बघणार?

मोबाईल किंवा लॅपटॉपवर सामना पाहू इच्छिणाऱ्या प्रेक्षकांना या सामन्याचे थेट प्रक्षेपण जिओ हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर पाहता येणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण येथे उपलब्ध असेल.

भारत विरुद्ध नामिबिया संभाव्य प्लेइंग ११

भारत – सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, शिवम दुबे, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह

नामिबिया – गेरहार्ड इरॅस्मस (कर्णधार), मालन क्रुगर, जेसी बाल्ट, जॅन फ्रायलिंक, जेजे स्मित, झेन ग्रीन (wk), निकोल लोफ्टी-ईटन, रुबेन ट्रम्पेलमन, बर्नार्ड स्कोल्ट्ज, बेन शिकोंगो, जॅक ब्रासेल

ताज्या बातम्या

इन्व्हेस्ट

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’! १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

0
मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आणि देशाच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून...