Sunday, November 24, 2024
Homeक्रीडाIND vs NED : आज भारत-नेदरलँड सामना; टीम इंडियात होणार बदल,'या' दोन...

IND vs NED : आज भारत-नेदरलँड सामना; टीम इंडियात होणार बदल,’या’ दोन खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता

मुंबई | Mumbai

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील (ICC ODI World Cup) साखळी टप्प्यातील ४५ वा आणि शेवटचा सामना आज भारत आणि नेदरलँड (India vs Netherlands) यांच्यात खेळविला जाणार आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (M Chinnaswamy Stadium) हे दोन्ही संघ आमने-सामने येणार असून या स्पर्धेत भारतीय संघाने आठ सामने जिंकून गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे…

- Advertisement -

भारत आणि नेदरलँड यांच्यातील हा तिसरा एकदिवसीय सामना असून या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत दोन सामने खेळले गेले आहेत. हे दोन्ही सामने विश्वचषकामध्ये झाले आहेत. २००३ च्या विश्वचषकमध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) पार्ल येथे नेदरलँड्सचा ६८ धावांनी पराभव केला होता. त्यानंतर २०११ च्या विश्वचषकात दोघांमध्ये नवी दिल्लीत सामना झाला होता. त्यावेळी भारताने नेदरलँड्सचा पाच गडी राखून पराभव केला होता. यानंतर भारतीय संघ बंगळुरूमध्ये नेदरलँड्सविरुद्धच्या वनडेमध्ये विजयाची हॅट्ट्रिक साधण्याचा प्रयत्न करेल.

ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर

दुसरीकडे हा सामना नेदरलँडसाठी महत्वाचा असणार आहे. या सामन्यात विजय मिळवून नेदरलँडला २०२५ मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) स्पर्धेत प्रवेश करण्याची संधी असणार आहे. त्यासाठी त्यांना बांगलादेशला (Bangladesh) मागे सोडावे लागेल. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे असणार आहे. त्यामुळे पाकिस्तानला (Pakistan) चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी थेट प्रवेश मिळाला आहे. तर गुणतालिकेतील टॉप ७ संघांना थेट प्रवेश मिळणार आहे. नेदरलँड गुणतालिकेत सर्वात शेवटी आहे. त्यामुळे नेदरलँडसाठी हा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे.

दरम्यान, आजच्या सामन्यात भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता असून संघातील प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादवला विश्रांती दिली जाऊ शकते. त्यांच्या जागी आर अश्विन आणि प्रसिद्ध कृष्णाला अंतिम ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते. याशिवाय आज बंगळुरूमध्ये पावसाची शक्यता केवळ तीन टक्के असून पावसामुळे खेळ खराब होण्याची शक्यता कमी आहे. तर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता १८ टक्के आहे. तसेच तापमान १६ ते २८ अंश सेल्सिअसच्या मध्ये राहण्याचा अंदाज आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले…

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या