Thursday, November 21, 2024
Homeक्रीडाInd vs Nz Test Match : भारतीय फलंदाजांनी न्युझीलंडच्या गोलंदाजांसमोर नांगी टाकली;...

Ind vs Nz Test Match : भारतीय फलंदाजांनी न्युझीलंडच्या गोलंदाजांसमोर नांगी टाकली; पहिल्या डावात अख्खा संघ ४६ धावांत बाद

मुंबई | Mumbai
घरच्या मैदानावर भारतीय संघाने लाजिरवाणी कामगिरी केली आहे. न्यूझीलंडच्या आक्रमणापुढे भारताचा संघ फक्त ४६ धावांत गार झालाय. मायदेशात भारताचा ही सर्वात निचांकी धावसंख्या ठरली. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, जो न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदांजांनी पूर्णपणे चुकीचा असल्याचा सिद्ध केला.

भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असे कधीही घडले नाही, जे आज म्हणजेच १७ ऑक्टोबर २०२४ रोजी बंगळुरू येथे घडले. विशेषतः जर आपण भारतात खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांबद्दल बोलायचे म्हणले तर भारताने पहिला कसोटी सामना १९३३ मध्ये खेळला होता. या दरम्यान अनेक खेळाडूंनी भारतीय संघाचे नेतृत्त्व केले, पण रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जो दुर्दैवी दिवस पाहिला गेला तो यापूर्वी कधीच पाहिला गेला नव्हता. कर्णधार खेळपट्टी वाचण्यात अपयशी ठरला का? हा प्रश्नही आता उपस्थित होऊ लागला आहे, कारण प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय रोहितने घेतला होता. पण हा निर्णय चांगलाच फसला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली. परिणामी भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या ४६ धावांत आटोपला आहे. घरच्या मैदानावर खेळताना भारतीय संघाची कसोटी सामन्यातील ही आतापर्यंतची निच्चांकी धावसंख्या ठरली.

- Advertisement -

मॅट हेनरी आणि विल्यम ओरुक यांच्या भेदक माऱ्यापुढे एकाही फलंदाजाला टिकाव धरता आला नाही. भारताचे पाच फलंदाज शून्य धावसंख्येवर बाद झाले. भारताकडून सर्वाधिक धावा ऋषभ पंत याने काढल्यात. पंतने २० धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने ६३ चेंडूत एका चौकाराच्या मदतीने १३ धावा केल्या. पंतने २ आणि यशस्वी जैस्वाल आणि मोहम्मद सिराज याने प्रत्येकी एक-एक चौकार मारला. भारताच्या पहिल्या डावात फक्त ४ चौकार मारले. मॅट हेनरी याने पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला तर विल्यम रुक याने चार विकेट घेतल्या. दोघांच्या भेदक माऱ्यापुढे भारताची बलाढ्य फलंदाजी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. भारताचे पाच फलंदाज खातेही उघडू शकले नाहीत. यामध्ये रनमशीन विराट कोहली, आर. अश्विन, रवींद्र जाडेजा आणि केएल राहुल यासारख्या दिग्गजांचा समावेश आहे.

पहिल्या तासात भारतीय संघाने गमावल्या आघाडीच्या तीन विकेट्स
पहिल्या दिवस पावसामुळे वाया गेला. परिणामी पहिल्या कसोटी सामन्यातील नाणेफेक ही दुसऱ्या दिवशी झाली. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय चांगलाच फसला. यशस्वी जैस्वालसोबत रोहित शर्मानं भारताच्या डावाला सुरुवात केली. धावफलकावर अवघ्या ९ धावा असताना रोहितच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का बसला. या धक्क्यातून टीम इंडिया सावरलीच नाही. विराट अन् सर्फराजही ठराविक अंतराने माघारी फिरले अन् टीम इंडिया अडचणीत आली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या