Wednesday, November 11, 2026
Homeब्रेकिंग न्यूजIND vs NZ 4th ODI : पावसाच्या बॅटिंगनंतर तिसरा वनडे सामना रद्द!...

IND vs NZ 4th ODI : पावसाच्या बॅटिंगनंतर तिसरा वनडे सामना रद्द! भारत-न्यूझीलंड चौथा वनडे सामना कधी आणि कुठे?

IND vs NZ 4th ODI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्याच्या सिरीजमधील तिसरा सामना आज हॅमिल्टनमध्ये खेळवला जात होता, पण पावसाच्या हजेरीमुळे सामना रद्द करावा लागला आहे. सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने एकही बॉल खेळला गेला नाही. भारताने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला होता पण पुन्हा पावसाने बॅटिंग केली अन् मॅच रद्द करावी लागली आहे. आता भारतीय क्रिकेट चाहत्यांना चौथ्या सामन्याची प्रतीक्षा लागली आहे. भारतीय संघ पुढचा सामना कधी खेळणार? हा सामना कोणत्या मैदानावर रंगणार? तसेच सामन्याची वेळ काय असेल?.

तीन सामन्यांनंतर भारतीय संघाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारताला आता मालिका गमावण्याची भीती नाही. दुसरीकडे, न्यूझीलंडसमोर उर्वरित दोन्ही सामने जिंकून मालिका 2-2 अशी बरोबरीत आणण्याचे आव्हान असेल. त्यामुळे चौथ्या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळू शकते.

- Advertisement -

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथा एकदिवसीय सामना शुक्रवार, 13 नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. तसेच हा सामना न्यूझीलंडमधील माउंट मौनगानुई येथील बे ओव्हल स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात भारतीय संघ विजय मिळवून मालिका आपल्या नावावर करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. विराट कोहली आणि रोहित शर्मा या अनुभवी फलंदाजांच्या कामगिरीकडेही चाहत्यांचे विशेष लक्ष असेल.

वनडे सामना किती वाजता सुरू होणार ?

भारतीय चाहत्यांना हा सामना सकाळी पाहता येणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजता नाणेफेक होईल, तर प्रत्यक्ष सामन्याला सकाळी 7:30 वाजता सुरुवात होईल. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना शुक्रवारची सकाळ क्रिकेटच्या रोमांचात घालवण्याची संधी मिळणार आहे.

ताज्या बातम्या

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार? शिवसेनेच्या ‘या’ नेत्याने उडवली...

0
मुंबई | Mumbai एकीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येण्याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. गुलाबराव पाटलांच्या सूचक...