Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजIND vs NZ Final Champions Trophy 2025 : न्यूझीलंडचे भारतासमोर विजयासाठी २५२...

IND vs NZ Final Champions Trophy 2025 : न्यूझीलंडचे भारतासमोर विजयासाठी २५२ धावांचे आव्हान

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

भारत आणि न्यूझीलंड (India and New Zealand) यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी (Batting) करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर न्यूझीलंडने ५० षटकांत सात गडी गमावत २५१ धावा केल्या आहेत. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी २५२ धावांचे आव्हान असणार आहे.

- Advertisement -

न्यूझीलंडच्या डावाची विल यंग आणि रचिन रवींद्रने (Will Young and Rachin Ravindra) सावध सुरूवात केली होती. चांगली सुरुवात झाल्यानंतर त्यांनी फटकेबाजी सुरू केली. पहिल्या तीन षटकांत न्यूझीलंडच्या अवघ्या दहा धावा झाल्या होत्या. परंतु चौथ्या षटकात रचिन रविंद्रने हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) जोरदार धुलाई केली. पांड्याच्या षटकात रचिनने एक षटकार आणि दोन चौकार मारले. पांड्याने एका षटकात १६ धावा दिल्या. त्यामुळे सातव्या षटकात न्यूझीलंडने बिनबाद ५१ धावा केल्या होत्या. त्याच दरम्यान मोहम्मद शमीने आपल्याच गोलंदाजीवर रचिन रविंद्रचा झेल सोडला.

तर आठव्या षटकात रचिन रवींद्र हा वरुण चक्रवर्तीचा चेंडूवर बाद झाला. परंतु डीआरएसमध्ये तो बाद नव्हता. त्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर रचिनला जीवनदान मिळाले. श्रेयर अय्यरने (Shreyar Iyer) त्याचा झेल सोडला. भारताच्या सुमार क्षेत्ररक्षणामुळे न्यूझीलंडच्या चांगल्या धावा होत होत्या. परंतु, त्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर वरुण चक्रवर्तीच्या फिरकीत यंग अडकला आणि एलबीडब्लू बाद झाला. त्याने १५ धावा केल्या. ५७ धावांवर न्यूझीलंडची पहिला गडी बाद झाला. त्यानंतर मात्र न्यूझीलंडचे फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर टिकाव धरू शकले नाहीत.

यानंतर कुलदीप यादवने रचिन रवींद्रला ३७ धावांवर क्लिनबोल्ड केले. त्यानंतर केन विल्यमसनचा मोठा अडथळा कुलदीपने दूर केला. विल्यमसन ११ धावांवर बाद झाला. यानंतर डॅरेल मिचेल आणि टॉम लॅथमने एक छोटी भागीदारी करत डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. परंतु टॉमला रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) एलबीडब्लू करत भारताला चौथी विकेट मिळवून दिली. एका बाजूने डॅरेल मिचने डाव सांभाळला. त्याला ग्लेन फिलिप्स हा साथ देत होता. पण वरुणने फिलिप्सला बाद करत न्यूझीलंडला पाचवा झटका दिला. न्यूझीलंडचे पाच गडी १६५ धावांवर बाद झाले होते.

दरम्यान, न्यूझीलंडने ५० षटकांत सात गडी गमावत २५१ धावा केल्या आहेत. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी (Win) २५२ धावांचे आव्हान असणार आहे. भारताकडून वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव या दोघांनी दोन गडी बाद केले. तर रवींद्र जडेजाने आणि मोहम्मद शम्मीने प्रत्येकी एक गडी बाद केला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...