Thursday, November 21, 2024
Homeक्रीडाIND Vs NZ 1st Test : पावसाचा खेळ चाले…इंडिया-न्यूझीलंड पहिला दिवसाचा खेळ...

IND Vs NZ 1st Test : पावसाचा खेळ चाले…इंडिया-न्यूझीलंड पहिला दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द; टॉसही होऊ शकला नाही

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातील पहिला दिवसाचा खेळ हा पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. या कसोटीतील पहिला सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर सुरु आहे. मात्र या सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ एकही चेंडी न टाकता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टीम इंडियाने नुकतंच कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली बांगलादेशला कसोटी मालिकेत क्लीन स्वीप केला होता. आता न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील आपला दावा मजबूत करण्याचा प्रयत्न टीम इंडिया असेल. मात्र, आता पहिल्याच दिवशी रोहित शर्माच्या हेतूवर पाणी फेरलं गेलं आहे. त्याला कारण बंगळुरूचा पाऊस असून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सिरीजच्या पहिल्याच दिवशी पावसाने खेळ खंडोबा केलाय. त्यामुळे टीम इंडियाला ड्रेसिंग रुम सोडून हॉटेलवर परतावे लागले.

- Advertisement -

या सामन्यातील पाचही दिवस पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यापैकी १ दिवस पावसामुळे धुतला गेला आहे. या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळू शकते. आता दुसऱ्या दिवसाचा खेळ होणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप लक्षात घेऊन टीम इंडियासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. भारताला आणखी ८ कसोटी सामने खेळायच्या आहेत आणि त्यापैकी ५ सामने टीम इंडियाला काहीही करून जिंकावेच लागणार आहे. अशातच आता पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला आणि एकही चेंडू टाकता आला नाही. त्यामुळे रोहित शर्माच्या टेन्शनमध्ये वाढ होऊ शकते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या