Wednesday, May 6, 2026
Homeक्रीडाभारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान हारिस रौफची नापाक हरकत; विमान पाडल्याची ॲक्शन करत भारतीयांना डिवचण्याचा...

भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान हारिस रौफची नापाक हरकत; विमान पाडल्याची ॲक्शन करत भारतीयांना डिवचण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
आशिया कप 2025 स्पर्धेत काल सुपर-4 मध्ये भारत-पाकिस्तान संघादरम्यान सामना झाला. या सामन्यात भारताने जोरदार विजय मिळवत पाकिस्तान संघाला धूळ चारली. भारत पाकिस्तान संघादरम्यान प्रत्येक सामना हा हायव्होल्टेज सामना असतो, आणि प्रत्येक सामन्यात काही ना काही घडामोडी या घडत असतात. तशाच घडामोडी कालच्या समान्यात झाल्या. ज्या क्षणी भारत पाकिस्तानला पराभूत करण्याच्या जवळ पोहोचला होता त्या वेळेस पाकिस्तानकडून नापाक हरकती करण्यास सुरवात झाली. पाकिस्तानी खेळाडू रडीचा डाव खेळतातच तसाच प्रकार मैदानात पहायला मिळाला.

पाकिस्तानचा फलंदाज साहिबजादा फरहानचे गन सेलिब्रेशन आणि त्यानंतर हारिस रौफने प्लेन पाडण्याची ॲक्शन केली. हारिस रौफचा प्लेन क्रॅश व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. तर त्यापूर्वी याच हारिस रौफचा अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलशी शाब्दिक वादही झाला. या सामन्यामध्ये पाकिस्तानी गोलंदाजांना मैदानात काही करता येत नसल्याने वाटेत ते चाळे सुरु करत भारतीय प्रेक्षकांना डिवचण्याचा प्रयत्न केला. ज्या गोष्टी घडल्याच नाहीत त्या गोष्टींवरुन पाकिस्तानी खेळाडू भारतीयांना डिवचण्याचा प्रयत्न करु लागले. असाच एक प्रयत्न कॅमेरात कैद झाला.

- Advertisement -

काल झालेल्या भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान पाकिस्तानी गोलंदाज हारिस रौफ याने सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करताना विमान खाली पडण्याची ॲक्शन केली. पण त्याने असे का केले असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. ती ॲक्शन म्हणजे विजयी सेलिब्रेशन करण्याची त्याची पद्धत होती का ? याचे उत्तर हो असे असे तर मॅच संपण्यापूर्वीच निकाल लागण्यापूर्वीच असे सेलिब्रेशन कोण करते? त्यामुळे त्याची ही ॲक्शन म्हणजे, त्याच्या मनात साठलेला राग होता, बाकी काही नाही, हे अगदी स्पष्ट होते.

पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमे आणि तेथील नागरिकांच्या दाव्यानुसार, पहलगाममधील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतरच्या संघर्षामध्ये सहा राफेल पाडल्याचा दावा केला. मात्र भारताने एकाही विमानाची हानी झालेली नाही असे वारंवार स्पष्ट केलेले आहे. तसेच भारतीय हवाईदलातील एकाही व्यक्तीला साधे खरचटलेही नसल्याचे भारताकडून वारंवार सांगितले आहे. असे असतानाही पाकिस्तानी दाव्यानुसार हरिस रौफ हा भारतीयांना सीमारेषेजवळ विमानं पाडल्याचे हाताने दर्शवत डिवचत होता. पाकिस्तानी चाहत्यांकडून हरिस रौफचे कौतुक करत हा व्हिडीओ शेअर केला जात आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Accident News : माळशेज घाटात बस-स्कॉर्पिओ अपघात; वडाळा-भेंड्यातील अंगणवाडी सेविकेसह चौघांचा...

0
नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa कल्याण-आहिल्यानगर महामार्गावरील वैशाखरे टोकावडे येथे मंगळवार दि. 5 मे रोजी झालेल्या बस आणि स्कॉर्पिओ कारच्या भीषण अपघातात नेवासा तालुक्यातील भेंडा व...