Tuesday, May 6, 2025
HomeनाशिकInd Vs Pak War Mock Drill : नाशिकमध्ये मॉक ड्रिलसाठी हायअलर्ट

Ind Vs Pak War Mock Drill : नाशिकमध्ये मॉक ड्रिलसाठी हायअलर्ट

 

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार देशभरातील २४४ सिव्हिल डिफेन्स जिल्ह्यांमध्ये (नागरिक सुरक्षा जिल्हे) मॉक ड्रिल होणार असून, महाराष्ट्रातील नाशिकसह ठाणे, पुणे, तारापूर (पालघर), रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांचा त्यात समावेश आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने हायअलर्ट जारी केला आहे. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच यासंदर्भात एक उच्चस्तरीय बैठक पार पडली असून, भारतीय लष्कराचे अधिकारीही या बैठकीस उपस्थित होते.

नाशिक जिल्ह्याचे विशेष महत्त्व नाशिकमध्ये इंडिया सिक्युरिटी प्रेस, करन्सी नोट प्रेस, देवळाली तोफखाना केंद्र, गांधीनगर आर्टिलरी सेंटर, एचएएल कारखाना, तसेच उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा इंधन डेपो पानेवाडी (मनमाड) आहे. देशाच्या सुरक्षेशी संबंधित या अत्यंत संवेदनशील आस्थापना नाशिकमध्ये असल्याने, नाशिकची मॉक ड्रिलसाठी निवड करण्यात आली असल्याचे समजते

मॉक ड्रिलची ठिकाणं आणि तयारी

नाशिक शहरातील एकूण ९ ठिकाणी सायरन बसवण्यात आले असून, त्यांची चाचणी नुकतीच पार पडली.

या ठिकाणी सायरन बसवलेले आहेत:
जिल्हाधिकारी कार्यालय
बीवायके कॉलेज
महापालिका मेनरोड कार्यालय
जिल्हा परिषद
झाकिर हुसेन रुग्णालय, कथडा
गांधीनगर प्रिंटिंग प्रेस
नेहरूनगर कस्टोडियन व ट्रान्झिस्ट होस्टेल
इंडिया सिक्युरिटी प्रेस (नाशिकरोड)
महापालिका कार्यालय (जव्हार मार्केट, नाशिकरोड)

मॉक ड्रिलची माहिती
केटीएचएम महाविद्यालय प्रांगण, गंगापूर रोड च्या प्रांगणामध्ये बुधवार दिनांक: ७ मे रोजी दुपारी ४ वाजता एअर, फायर रेस्क्यू, ब्लॅकआउट या माध्यमातून जाणार आहे. या उपक्रमात प्रामुख्याने पोलीस, अग्निशमन दल, सिव्हिल डिफेन्स, एनसीसी, एनएसएस, व इतर सुरक्षा विभाग यांचा समावेश राहणार आहे

सायरन वाजल्यावर नागरिकांनी काय करावे?

नागरिकांनी घाबरू नये; युद्धजन्य परिस्थितीतील हा केवळ सराव आहे.मोकळ्या जागेत असाल तर सुरक्षित ठिकाणी जावे. घरातच राहावे किंवा मजबूत इमारतीत प्रवेश करावा. घरातील दिवे बंद करावेत; काचेपासून दूर राहावे. बाथरूमसारखी खोलगट जागा सर्वात सुरक्षित मानली जाते. विंडो पॅनवर प्लास्टिक कव्हर लावणे उपयुक्त ठरते.

मॉक ड्रिलबाबत सोशल मीडियावर पसरवले जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. हे नियमित सरावाचाच एक भाग आहे. प्रशासनाच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा
जलज शर्मा जिल्हाधिकारी नाशिक

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वीज कोसळून नारळाच झाड जळून खाक

0
निफाड। प्रतिनिधी Niphad निफाड येथे अवकाळी पावसाने व गारपिटीने 3 ते 3.30 वाजेदरम्यान निफाड-येवला मार्गावरील हॉटेल नक्षत्रच्या समोरील जुने शिवरे रस्त्याच्या बाजूस अजय गणपतराव गोळे...