Wednesday, May 6, 2026
Homeक्रीडाINDvsSA 1st ODI: रांचीत रो-को जोडीचा धमाका! रोहित-विराटची विक्रमी फलंदाजी, अफ्रिकेसमोर ३५०...

INDvsSA 1st ODI: रांचीत रो-को जोडीचा धमाका! रोहित-विराटची विक्रमी फलंदाजी, अफ्रिकेसमोर ३५० तगडे आव्हान

रांची | Ranchi
दक्षिण आफ्रिकेविरोधात कसोटी मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरोधातील एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात चांगली सुरुवात केली आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना हा रांची येथे होत आहे. या सामन्यात भारतीय संघाने ५० षटकात ३५० धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवले आहे. या सामन्यात भारताच्या रन मशीन विराट कोहलीने शानदार शतक ठोकले आहे. पहिल्या डावात प्रेक्षकांना भरपूर रोमांच अनुभवायला मिळाला, कारण ‘रो-को’ची जोडी पुन्हा एकदा मैदानात चमकताना दिसली.

रो-को जोडीची कमाल
विराट कोहली आणि रोहित शर्मा या अनुभवी जोडीने आपल्यातील दमदार खेळीने प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. टीम इंडियाला शतकी भागीदारीसह दक्षिण आफ्रिकेच्या संघातील गोलंदाजांचे वाभाडे काढले. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १०९ चेंडूत १३६ धावांची दमदार भागीदारी रचली. रोहित आता वनडे इतिहासातील सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडू ठरला आहे.

- Advertisement -

रोहित शर्माने वनडे क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत 352 सिक्स ठोकले असून त्यामुळे सर्वाधिक सिक्स ठोकण्याचा रेकॉर्ड नावावर केला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड शाहिद आफ्रिदीच्या नावावर होता, त्याने 351सिक्स ठोकले होते. त्या खालोखाल ख्रिस गेल (331), सनाथ जयसूर्या (270), महेंद्र सिंह धोनी (229) इत्यादींचा समावेश होता. रोहित शर्माची विकेट पडली तेव्हा स्कोअर 2 विकेट्सवर 161 धावा असा स्कोअर होता. 

विराटची शतकी वाटचाल
विराट कोहलीने १२० चेंडूंचा सामना करताना १३५ धडाकेबाज धावा करून संघाला भक्कम धावसंख्या उभारुन दिली. या खेळीमध्ये त्याने ११ चौकार आणि ७ षटकार मारले. त्याचबरोबर त्याने वनडेमध्ये ५२ शतके पूर्ण करत एकाच फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतकांचा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला. त्याने सचिन तेंडुलकरच्या कसोटीमधील ५१ शतकांच्या विक्रमालाही मागे टाकले.

रोहित शर्माने आपल्या कारकिर्दीतील ६० वे एकदिवसीय अर्धशतक पूर्ण केले. त्याने ४३ चेंडूंमध्ये यावेळी ५ चौकार आणि २ षटकार लगावले. पण, ५७ धावांवर तो पायचीत (LBW) झाला. त्यानंतर ऋतुराज गायकवाडने ८ धावांचे तर वॉशिंग्टन सुंदरने १३ धावांचे योगदान दिले. मात्र, त्यानंतर कर्णधार के. एल. राहुलने कोहलीला चांगली साथ दिली. विराट कोहली आणि के. एल. राहुलने पाचव्या विकेटसाठी ७४ चेंडूंमध्ये ७६ धावा केल्या.

विराट बाद झाल्यानंतर राहुलने जडेजासोबत धावसंख्या खेळती ठेवली आणि सहाव्या विकेटसाठी दोघांनी तब्बल ६५ धावांची खेळी केली. यावेळी कर्णधार राहुलने १९ वे एकदिवसीय अर्धशतक साजरे केले. पण तो ६० धावांवर आणि रवींद्र जडेजा २० चेंडूंमध्ये ३२ धावा करत बाद झाला. यावेळी भारतीय संघाने ८ विकेट्स गमावत ३४९ धावांची धावसंख्या उभारली. यावेळी दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जॅनसेन, नांद्रे बर्गर, कॉर्बिन बॉश आणि ओटनील बार्टमन प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Accident News : माळशेज घाटात बस-स्कॉर्पिओ अपघात; वडाळा-भेंड्यातील अंगणवाडी सेविकेसह चौघांचा...

0
नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa कल्याण-आहिल्यानगर महामार्गावरील वैशाखरे टोकावडे येथे मंगळवार दि. 5 मे रोजी झालेल्या बस आणि स्कॉर्पिओ कारच्या भीषण अपघातात नेवासा तालुक्यातील भेंडा व...