Tuesday, May 14, 2024
Homeमुख्य बातम्याIND VS SL-T20 Series : भारताने मालिका ३-० ने जिंकली

IND VS SL-T20 Series : भारताने मालिका ३-० ने जिंकली

धर्मशाला । वृत्तसंस्था Dharamshala

भारत आणि श्रीलंका ( IND VS SL T-20 Series )यांच्यातील तिसरा आणि शेवटचा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना आज धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला . त्यात भारताने श्रीलंकेविरुद्धची T 20 सामन्याची मालिका ३-० ने जिंकली.

- Advertisement -

श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.मोहम्मद सिराजने पहिल्याच षटकात श्रीलंकेला झटका देत सामन्यास सुरवात केली . सलामीवीर दानुष्का गुणाथिलकाला सिराजने शुन्यावर क्लीन बोल्ड . सलामीवीर पाथुम निसंका अवघ्या एक रन्सवर बाद झाला. आवेश खानच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. वेंकटेश अय्यरने त्याचा झेल घेतला. श्रीलंकेच्या दोन षटकात दोन बाद पाच धावा केल्या .

आवेश खानने श्रीलंकेला तिसरा धक्का दिला आहे. चारिथा असालंका अवघ्या चार धावांवर बाद झाला. विकेटकीपर संजू सॅमसनने त्याचा झेल घेतला.फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईने श्रीलंकेला चौथा धक्का दिला. जानिथ लियांगेला 9 धावांवर बिश्नोईने क्लीन बोल्ड केलं. आठ षटकात श्रीलंकेच्या चार बाद 29 धावा झाल्या होत्या.

कर्णधार दासुन शनाकाच्या दमदार फलंदाजीच्या बळावर श्रीलंकेने 19 षटकात पाचबाद 134 धावा केल्या एकोणविसाव्या व्या षटकात 19 धावा निघाल्या.38 चेंडूतील त्याच्या नाबाद 74 धावांच्या खेळीच्या बळावर श्रीलंकेने भारताला विजयासाठी 147 धावांचे लक्ष्य दिले.

श्रीलंकेने दिलेल्या १४८ धावांचे आव्हान स्वीकारत भारताच्या फलंदाजीस रोहित शर्मा आणि संजू सॅमसन ही सलामीची जोडी मैदानात आली . पहिल्या षटकात भारताच्या बिनबाद 5 धावा झाल्या. रोहित शर्माला पाच धावांवर झेलबाद झाला. रोहित बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने सावरला डाव. श्रेयस अय्यरने दमदार फलंदाजी केली संजूसॅमसनला चंडीमलकरने 18 धावांवर झेलबाद केले. संजू सॅमसनने त्याच्या खेळीत तीन चौकार लगावले.

श्रेयस अय्यर आणि दीपक हुड्डा यांनी धावसंख्या वाढविली .लाहीरु कुमारने दीपक हुड्डाला २१ धावांवर बाद केले. दरम्यान श्रेयस अय्यरने शानदार षटकार खेचून या मालिकेतील अर्धशतकाची हॅट्रीक पूर्ण केली. श्रेयसचं हे सलग तिसरं अर्धशतक केले. वेंकटेश अय्यर कुमाराच्या गोलंदाजीवर पाच धावांवर बाद झाला झाला. दरम्यान भारताच्या चार बाद १०४ अशी धावसंख्या होती .

रवींद्र जाडेजा (22) आणि श्रेयस अय्यरने (73) भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. भारताने श्रीलंकेविरुद्धचा तिसरा T 20 सामना सहा विकेटने जिंकला. अशा प्रकारे भारताने मालिकेत 3-0 असे यश संपादन केलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या