दिल्ली | Delhi
जागतिक कसोटी विश्वचषकात ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यानंतर आज भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडिजबरोबर सामना होणार आहे. तीन कसोटी, दोन वनडे आणि पाच टी-ट्वेंटी सामन्यांची मालिका दोन्ही संघात खेळवली जाणार आहे. त्यातील पहिला कसोटी सामना आजपासून विंडसर पार्क मैदानावर खेळवला जाणार आहे.
भारतीय चाहत्यांना मात्र ही मालिका बघण्यासाठी आपल्या दिवसाच्या वेळापत्रकात मोठा बदल करावा लागणार आहे. कारण, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वेळेत खूप मोठी तफावत असल्याने भारतीय चाहत्यांना हे सामने मध्यरात्रीपर्यंत जागून पाहावे लागतील. भारतीय वेळेनुसार, कसोटी सामने संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होणार आहेत. तर एकदिवसीय सामने सात वाजता सुरुवात होणार आहेत. टी२० सामन्याला रात्री 8 वाजता सुरु होणार आहे.
WTC फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर टीम इंडिया नव्या उमेदीने मैदानावर विजयासाठी उतरणार आहे. आज होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी अनेक नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला संघातून वगळण्यात आले आहे. WTC च्या दुसऱ्या आवृत्तीतील वेस्ट इंडिज संघाची कामगिरी जर पाहिली तर ती खूपच खराब होती. संघ ८व्या स्थानावर राहिला. विंडीज संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटची कसोटी मालिका खेळली होती, ज्यामध्ये त्यांना २-०ने पराभवाचा सामना करावा लागला होता. आता या कसोटी मालिकेत विंडीजचा कसोटी कर्णधार क्रेग ब्रॅथवेट संघाकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा करेल.
अशी असु शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), रविंद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि जयदेव उनाडकट.