मुंबई | Mumbai
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज (India vs West Indies) संघांमध्ये पाच सामन्यांच्या T-20 मालिकेला तीन ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघाने आज मंगळवारी काही वेळापूर्वी आपल्या पंधरा सदस्यीय संघांची घोषणा केली आहे. संघाचे कर्णधारपद रोवमन पोवेल सांभाळणार आहे. तर शाई होप बऱ्याच काळानंतर वेस्टइंडीज संघाच्या टी-ट्वेंटी संघामध्ये परतला आहे.
या संघांमध्ये एक दिवसीय मालिकेमध्ये वेस्ट इंडिज संघाचा भाग असलेल्या ओशेन थोमस याला यालाही संघात संधी मिळाली आहे. मागील वर्षभरापासून संघाबाहेर असलेल्या ओशेन थोमस 2021 मध्ये वेस्ट इंडिज संघासाठी अखेरचा सामना खेळला होता.
VIDEO : मोदींकडून हस्तोंदलनासाठी पुढाकार, शरद पवार यांनी पाठ थोपटली; व्यासपीठावर नेमकं काय घडलं?
2022 मध्ये शाई होपने कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर भारताविरुद्ध झालेल्या सामन्यात वेस्टइंडीज संघाचे प्रतिनिधित्व केले होते. वेस्ट इंडिज सांगा कडून संघाचे उपकर्णधारपद कायदे मायर्स सांभाळणार आहे.
लोकमान्य टिळक पुरस्कार मिळाल्याने माझी जबाबदारी आणखी वाढली – पंतप्रधान मोदी
या संघात माजी कर्णधार निकोलस पुरण, जेसन होल्डर यांना संधी देण्यात आली आहे. जोनारथन चार्ल्स, जेसन होल्डर, अकिल हुसेन, शाई होप, ब्रेंडन किंग, कायले मायर्स,रोवमन पोवेल, रोमारियो शेफर्ड, ओशेन थॉमस, ओडेन स्मिथ, निकोलस पुरण यांचा समावेश करण्यात आला आहे.
सलिल परांजपे, नाशिक.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
अखेर महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता मिळाला! विजय वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब