Wednesday, March 26, 2025
Homeब्रेकिंग न्यूजIND Vs ZIM T-20 Series : भारताचा झिंबाब्वे क्रिकेट संघावर मालिका विजय

IND Vs ZIM T-20 Series : भारताचा झिंबाब्वे क्रिकेट संघावर मालिका विजय

नाशिक | सलिल परांजपे

भारत विरुद्ध झिंबाब्वे क्रिकेट संघामध्ये ५ सामन्यांच्या टी २० मालिकेतील चौथ्या सामन्यात १० गडी राखून जिंकून ५ सामन्यांच्या मालिकेत ३-१ ने विजयी आघाडी घेतली आहे. तसेच शुभमन गीलच्या युवा भारतीय क्रिकेट संघाने मालिका आपल्या खिशात टाकली आहे.

- Advertisement -

नाणेफेक जिंकून भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार शुभमन गीलने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. झिंबाब्वे संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १५२ धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाने १५.२ षटकांत १५६-० धावा केल्या.

भारताकडून सलामीवीर फलंदाज शुभमन गील आणि यशस्वी जयस्वाल यांनी शानदार सुरुवात केली. यशस्वी जयस्वाल ने एका बाजूने आक्रमण सुरू ठेवले. त्याला शुभमन गीलने चांगली साथ दिली. दोन्ही फलंदाजांनी खेळपट्टीवर आपला जम बसवला. व त्यानंतर आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली.
यशस्वी जयस्वाल ने ५३ चेंडूचा सामना करताना १३ चौकार आणि २ षटकारांचा पाउस पाडत नाबाद (९३) धावांची खेळी साकारली. कर्णधार शुभमन गीलने ३९ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकार खेचून नाबाद (५८) धावा केल्या.

झिंबाब्वे क्रिकेट संघाकडून कर्णधार सिकंदर रझाने २८ चेंडूत (४६) वेस्ली मधवीरे (२५) आणि तादिवानशे मारूमणी (३२) धावा केल्या.
भारतीय क्रिकेट संघाकडून खलील अहमद ने २ तर आवेश खानच्या बदली खेळाडू म्हणून पदार्पण करण्याची संधी देण्यात आलेल्या मुंबईकर गोलंदाज तुषार देशपांडे, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. यशस्वी जयस्वाल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
पाचवा सामना रविवारी १४ जूलै २०२४ रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर होणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : व्यावसायिकाच्या घरी जबरी चोरीचा प्रयत्न

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शहरातील साईनगर, बुरूडगाव रस्ता येथे 22 मार्च रोजी पहाटे चार अज्ञात इसमांनी जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी व्यावसायिक...