Saturday, April 26, 2025
HomeराजकीयHarshavardhan Patil : अखेर हर्षवर्धन पाटलांच्या हाती 'तुतारी'! इंदापूरातून उमेदवारीही जवळपास निश्चित

Harshavardhan Patil : अखेर हर्षवर्धन पाटलांच्या हाती ‘तुतारी’! इंदापूरातून उमेदवारीही जवळपास निश्चित

इंदापूर । Indapur

आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून जागावाटप, संभाव्य उमेदवार, इच्छुकांची समजूत अशा गोष्टींवर भर दिला जात आहे. एकीकडे या घडामोडी घडत असताना दुसरीकडे पक्षांतरालाही वेग आला आहे. त्यातलंच एक मोठं नाव म्हणजे हर्षवर्धन पाटील. भाजपामधून हर्षवर्धन पाटील यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटामध्ये प्रवेश केला आहे.

- Advertisement -

दरम्यान, भाजपातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या हर्षवर्धन पाटील यांची इंदापूरमधून उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. कारण, इंदापूरमधील सभेत जयंत पाटील यांनी तसे संकेत दिले आहेत. जागावाटप निर्णय झाल्याशिवाय उमेदवारी जाहीर करता येत नाही. मी त्यांना तुतारी हातात देतोय. कार्यकर्त्यांची चर्चा केली आणि मग तिकडे गेलो इकडे गेलो आता कार्यकर्त्यांची चर्चा नाही हे फायनल आहे, असे म्हणत जयंत पाटील यांनी एकप्रकारे हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर केली.

जयंत पाटील बोलताना म्हणाले, इंदापूरची जागा आम्हाला निवडून आणायची आहे. दोन दिवसात काही निर्णय होतील. ती मानसिकता असणाऱ्या आमच्या महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी लोक आज राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी उत्सुक झालेली आहे. सुधारणा करायला आमच्या मार्गाने यायचं विचार करा. या मतदारसंघातल्या सर्वांना माझा आव्हान आहे की पवार साहेब सामाजिक समतोल ढळू न देता पक्ष चालवतात. इंदापूरमध्ये विजय आवश्यक आहे, म्हणून आम्ही आग्रहाने हर्षवर्धन पाटील यांना निमंत्रित केलं आणि ते आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले.

तसेच, २०१९ ज्या विधानसभा निवडणुकीवेळी अनेक लोक सोडून गेले. नेत्याच्या मागे उभा राहण्याची महाराष्ट्राची मराठी माणसाची पद्धत आणि मानसिकता आहे. दिल्लीवाल्यांनी जेव्हा जेव्हा जबरदस्ती केली, तेव्हा तेव्हा शरद पवार साहेबांनी मराठी स्वाभिमान दाखवण्याचं काम केलं. २०१९ साली हर्षवर्धन पाटील साहेब हे भारतीय जनता पक्षाच्या काही प्रश्नांमुळे गेले, हर्षवर्धन भाऊ तुमचा स्वागत करताना आनंद होतेय. आमच्या घरात जरा गर्दी होती, त्यामुळे तुम्हाला येता आलं नाही, आज तुम्ही येताय याचा आम्हाला आनंद आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Pahalgam Terror Attack : कागदी घोडे नाचवणे थांबवा, ठोस कारवाई तुम्ही...

0
पुणे(प्रतिनिधी) राज्यकर्ते केवळ कागदी घोडे नाचवत आहेत. पण, आता हे थांबवा. ठोस कारवाई करा. दहशतवाद्यांची ट्रेनिंग सेंटर उद्धवस्त करा, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष...