Sunday, November 24, 2024
Homeधुळेकर्जबाजारी शेतकर्‍याची रेल्वेखाली झोकून आत्महत्या

कर्जबाजारी शेतकर्‍याची रेल्वेखाली झोकून आत्महत्या

दोंडाईचा । श.प्र. dhule

डोंगरगाव ता.शाहदा येथील शेतकर्‍याने दोंडाईचा जवळील रामी-पथारे शिवारात धावत्या रेल्वेखाली झोकून देवून आत्महत्या केली. याबाबत दोंडाईचा पोलीस ठाण्यात प्रथमदर्शी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

- Advertisement -

प्रेमसिंग रतनसिंग गिरासे (वय 57 वर्ष) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. सतत नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्‍याने आत्महत्या केल्याचे समजते. रेल्वे रुळावर छिन्नविछिन्न अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. दि. 17 जून रोजी दोंडाईचा जवळील रामी-पथारे जवळ असलेल्या रेल्वे रूळावर एका अज्ञात व्यक्तीने रेल्वे गाडी क्रमांक 22563 जयनगर एक्सप्रेस खाली आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. सदर आत्महत्या करणारे व्यक्तीचा शोध पोलीसांनी घेतला असता तो शहादा ता. डोंगरगाव येथील रहिवासी प्रेमसिंग रतनसिंग गिरासे (वय 57 वर्ष) असल्याचे निषन्न झाले.

प्रेमसिंग गिरासे हा शेतकरी असून त्याचा शेतावरच उदरनिर्वाह होता. मात्र काही वर्षांपासून निसर्गाची साथ मिळत नसल्याने तो चिंतेत होता. त्यातच त्याने शेतीवर कर्ज घेतले होते. वेळेत कर्जाची परतफेड होत नसल्याने तो काही दिवसांपासून चिंतेत होता.आज सकाळी दोंडाईचा येथे येऊन रामी- पथारे जवळ रेल्वे खाली येऊन आत्महत्या केली. याबबत दोंडाईचा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास दोंडाईचा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या