Friday, October 4, 2024
HomeनाशिकVideo : नाशिकमधील बँकेवर निर्बंध : ठेवीदार अडचणीत

Video : नाशिकमधील बँकेवर निर्बंध : ठेवीदार अडचणीत

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून नाशिकमधील इंडिपेन्डन्स को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे बँकेच्या खातेदारांना आता सहा महिने पैसे काढता येणार नाहीत.

गुरुवारी निर्बंध लादल्यानंतर शुक्रवारी बँकेत येऊन चौकशी करत होते. बँकेतील कर्मचारीही यासंदर्भात काही बोलण्यास तयार नव्हते. इंडिपेन्डन्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे जवळपास ९९.८८ टक्के खातेदार हे डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशनच्या विमा सुरक्षेसाठी पात्र आहेत.

- Advertisement -

या विमा सुरक्षा योजनेत बँक खातेदाराला पाच लाखांपर्यंतच्या ठेवीवर विमा सुरक्षा पुरवली जाते.

- Advertisment -

ताज्या बातम्या