आज १५ ऑगस्ट. संपूर्ण भारतात स्वातंत्र्याचा आनंद साजरा केला जात आहे. १५ ऑगस्ट म्हणजे त्या वीरपुत्रांना आणि जवानांचा स्मरण्याचा दिवस असतो ज्यांनी भारत भूमीला स्वतंत्र करण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली होती. प्रत्येकजण स्वातंत्र्य दिनाचा आनंद सेलिब्रेट करताना दिसतो. बॉलिवूडमध्येही असे अनेक सिनेमे आहेत जे पाहिल्यानंतर प्रत्येक देशवासियाला आपल्या भारत भूमीवर गर्व वाटतो.
बॉर्डर
‘संदेसे आते है…’ या गाण्याने प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू आणणारा जेपी दत्ता यांचा हा चित्रपट १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. या चित्रपटात सैनिकांची कथा दाखवण्यात आली आहे.
उरी : सर्जिकल स्ट्राईक
२०१६ मध्ये पाकिस्तानच्या उरी हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी सर्जिकल स्ट्राईक केला होता. या सर्जिकल स्ट्राईकवर २०१९ साली चित्रपट बनवण्यात आला.
भुज : द प्राईड ऑफ इंडिया
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, शरद केळकर, एमी विर्क आणि नोरा फतेही मल्टीस्टारर चित्रपट ‘भुज: द प्राईड ऑफ इंडिया’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.
शेरशाह
परमवीर चक्र पुरस्कार विजेते कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित ‘शेरशाह’ हा चित्रपट आहे. या चित्रपटात कारगिल युद्धादरम्यान भारतीय जवानांचे शौर्य दाखवण्यात आले आहे. अनेक जवानांनी देशासाठी बलिदान दिले होते, त्यात विक्रम बत्रा हे देखील सामील होते.
राझी
मेघना गुलजार दिग्दर्शित ‘राझी’ हा चित्रपट आलिया भट्टच्या चित्रपट कारकिर्दीतील सर्वात उत्कृष्ट कलाकृतींपैकी एक मानला जातो. ‘कॉलिंग सेहमत’ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट सेहमत खान या तरुण काश्मिरी मुलीची प्रेरणादायी कथा आहे.