मुंबई । Mumbai
ब्रिटीश राजवटीला झुगारत भारताने स्वातंत्र्य मिळवले. आज भारताचा ७८ वा स्वातंत्र्यदिन (Independence Day 2024) आहे. देशभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमधून नागरिक आपली देशभक्ती व्यक्त करत आहेत.
आज राष्ट्रीय सणानिमित्त सर्वत्र आनंदाचं, चैतन्याचं वातावरण आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ‘वर्षा’ या आपल्या निवासस्थानी स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण केले आहे.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी X अकाउंटवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, “आ चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे… स्वातंत्र्य दिन चिरायू होवो… भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा….”.
देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू,पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संपूर्ण देश स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी सज्ज झालाय. मी पुन्हा एकदा तुम्हाला, विशेषत: सशस्त्र दलातील आपल्या शूर जवानांना, जे आपला जीव धोक्यात घालून आपल्या स्वातंत्र्याचं रक्षण करतात, त्यांना शुभेच्छा देते, अशी सोशल मीडिया पोस्ट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलीय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X अकाउंटवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद! माझ्या भारतीय बांधवांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद!