Friday, October 18, 2024
Homeमुख्य बातम्या'…नाहीतर मीच बच्चू कडूला संपवणार' ; बच्चू कडूंचे पोलीस अधिकक्षकांना पत्र

‘…नाहीतर मीच बच्चू कडूला संपवणार’ ; बच्चू कडूंचे पोलीस अधिकक्षकांना पत्र

अमरावती | Amravati
अमरावतीच्या अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी पोलीस अधीक्षकांना एक खळबळजनक पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप केला आहे. माझा अपघात झाला अशा प्रकारचे नागरिकांचे फोन येत आहेत. अपघात झाल्याची कोणीतरी अफवा पसरवत आहे, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी बच्चू कडू यांनी केलीय.

बच्चू कडू यांचा घातपात करण्याचा कोणाचा प्लँन? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बच्चू कडू यांनी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना लिहिलेले पत्र समोर आले आहे. यात धमकी देणाऱ्याने मी शिंदे साहेबांचा कट्टर कार्यकर्ता असल्याचा दावा केला आहे. तसेच आपले नक्षलवाद्यांशी नजीकचे संबंध असल्याचेही म्हटले आहे.

- Advertisement -

काय म्हंटले आहे पत्रात?
बच्चू कडू यांनी पत्रात म्हटले की, अचलपूरमध्ये भाजी विक्रेत्याजळ एका दुचाकीवरून आलेल्या माणसाने भाजी विक्रेत्यासोबत बोलताना आपण शिंदे साहेबांचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले आणि बच्चू कडूला संपवणार असल्याचे म्हटले. शिंदे साहेब बच्चू कडूला संपवणार. नाहीतर मीच बच्चू कडूला संपवणार असे म्हणत शिंदे साहेब आणि मंत्र्यांसोबतचे फोटोही दाखवले. माझ्यावर जीवघेणा हल्ला करण्याचे कट रचले जात अून जिविताला धोका निर्माण झाला असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. जसे बाळासाहेब ठाकरे यांनी दिघेला संपविले तसेच शिंदे साहेब बच्चू कडूला संपवणार. नाहीतर मीच स्वतः बच्चू कडूला संपवणार. बच्चू कडू म्हणजे काहीच नाही”. बच्चू कडूला पाहून घेऊ… आज मोका देख के बच्चू कडू को चौका मारेंगे.

इतकंच नाही, तर माझा अपघात झाला असल्याबाबतचे मला २ ते ३ दिवसापासून माझ्या मतदार संघातील कार्यकर्त्यांचे, नागरिकांचे फोन येत आहे. माझा अपघात झाला असल्याची अफवा पसरविण्याचे काम सुरू आहे. तरी प्राप्त झालेल्या गोपनिय माहीतीच्या अनुषंगाने उपरोक्त दोन्ही प्रकरणांची सखोल चौकशी करून संबधित व्यतीवर गुन्हा दाखल करून त्यांना जेरबंद करण्यात यावे. जर माझ्या जिवितेला धोका उद्भवल्यास याची जबाबदारी आपलेवर राहील, असे आमदार कडू यांनी पत्रात म्हटलेय.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या