Thursday, February 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजअमित शहांना 'शेअर मार्केट'बाबत केलेले 'ते' वक्तव्य भोवणार?

अमित शहांना ‘शेअर मार्केट’बाबत केलेले ‘ते’ वक्तव्य भोवणार?

मुंबई । Mumbai

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्याला कारण ठरलंय लोकसभा निवडणूक निकालापूर्वी (Lok Sabha Election Result 2024) शेअर बाजाराबाबत (Stock Market) केलेलं वक्तव्य. इंडिया आघाडीचे (India Allince) खासदार आज सेबीकडे शाह यांच्याविरोधात तक्रार करणार आहेत.

- Advertisement -

सेबीकडे तक्रार करायला जाण्यापूर्वी इंडिया आघाडीच्या खासदारांनी शरद पवार यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकवर भेट घेतली. यावेळी तृणमुलचे खासदार साकेत गोखले, कल्याण बॅनर्जी आणि सागरीका घोष उपस्थित होते. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने अरविंद सावंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रतिनिधी म्हणून सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.

YouTube video player

लोकसभा निवडणूकीच्या निकालापूर्वी शेअर बाजारात मोठी वाढ झाली होती. तर निकालाच्या दिवशी बाजारात कमालीची पडझड पाहायला मिळाली होती. यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारताच्या शेअर बाजाराच्या इतिहासातील हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप करत जेपीसी चौकशीची मागणी केली होती.

अमित शाह नेमकं काय म्हणाले होते?

एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान अमित शाह म्हणाले होते की, शेअर बाजारातील घसरणीचा निवडणुकीशी संबंध जोडू नये. ४ जून २०२४ नंतर शेअर बाजार वाढणारच आहे. शेअर बाजार कोसळण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही १६ वेळा शेअर बाजार कोसळला आहे, त्यामुळे त्याचा संबंध निवडणुकीशी जोडला जाऊ नये. ४ जूनपूर्वी खरेदी करा, कारण त्यानंतर बाजार वाढणारच आहे, असे भाकितही त्यांनी केले होते.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पोलीस शिपाई पदांसाठी उच्चशिक्षित मैदानात

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गाच्या 73 रिक्त पदांसाठी होणार्‍या भरती प्रक्रियेस 11 फेब्रुवारी पासून सुरूवात होत असून 14 फेब्रुवारीपर्यंत मैदानी...