Tuesday, November 26, 2024
Homeक्रीडा१७ डिसेंबरपासून भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका

१७ डिसेंबरपासून भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका

मुंबई | Mumbai

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून ऍडिलेड येथे सुरुवात होणार आहे.

- Advertisement -

हा कसोटी सामना दिवस -रात्र खेळवण्यात येणार आहे. सामन्यात गुलाबी चेंडूचा वापर करण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलिया संघाने भारताला एकदिवसीय मालिकेत २-१ अशा फरकाने पराभूत केले होते.

या पराभवाची परतफेड करताना भारताने टी २० मालिका २-१ ने जिंकली होती. टी २० मालिका विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. तर टी २० मालिकेतील पराभव मागे सारून पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ सज्ज आहे.

कसोटी मालिकेत विजयी सुरुवात करण्यासाठी टीम इंडिया देखील सज्ज आहे. ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व टीम पेन करणार आहे. मात्र ऑस्ट्रेलिया संघाचा सलामी डावखुरा फलंदाज डेविड वॉर्नर याने पहिल्या कसोटीतून माघार घेतली आहे. त्यामुळे भारतीय संघाला विजयासाठी अधिक पसंती देण्यांत येत आहे.

भारतीय संघ आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत दुसऱ्या स्थानी तर ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर आहे. २०१८ मध्ये झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला २-१ ने पराभूत केले होते त्या पराभवाची परतफेड करण्यासाठी ऑस्ट्रेलिया उत्सुक आहे.

ऑस्ट्रेलिया संघाच्या फलंदाजीची भिस्त डेविड वॉर्नर, स्टीव्ह स्मीथ, जो बर्नन्स, विल पुकोस्कीयांच्यावर असणार आहे. अष्टपैलूंमध्ये मर्नास लबुशेन , मायकल नेसर , कॅमेरॉन ग्रीन , ट्रॅव्हिस हेड आहेत. यष्टीरक्षक म्हणून टीम पेन आणि म्याथ्युवेड आहेत. गोलंदाजीत पॅट कमिन्स , जेम्स पॅटिन्सन, शॉन एबोट, मिचेल स्टार्क, नेथन लायन आहेत.

– सलिल परांजपे, नाशिक

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या