Monday, November 25, 2024
Homeक्रीडाAsia Cup 2023 Final : भारताने उडवला श्रीलंकेचा धुव्वा; १० गडी...

Asia Cup 2023 Final : भारताने उडवला श्रीलंकेचा धुव्वा; १० गडी राखून विजय,आशिया चषकावर कोरले आठव्यांदा नाव

कोलंबो | Colombo

आशिया कप २०२३ (Asia Cup 2023) मध्ये भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात (Final Match) भारताने १० गडी राखून श्रीलंकेवर विजय मिळविला. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारताचा गोलंदाज मोहम्मद सिराजच्या (Mohammad Siraj) भेदक माऱ्यापुढे श्रीलंकेचा संघ अवघ्या ५० धावांत गारद झाला….

- Advertisement -

PM Narendra Modi Birthday : लहानपणीचे कष्टाळू, गुजरातचे मुख्यमंत्री ते जगातील प्रभावशाली नेते पंतप्रधान मोदी

त्यानंतर भारताने फार वेळ न घेता ६.१ षटकात १० गडी राखून श्रीलंकेचा धुव्वा उडवला. भारताच्या डावाची इशान किशन आणि शुबमन गिल यांनी सुरुवात करून नाबाद ५१ धावा करत भारतीय संघाला (Indian Team) एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय मिळवून दिला. या सामन्यात शुभमन गिल याने १९ चेंडूत सहा चौकारांच्या मदतीने नाबाद २७ तर ईशान किशन याने १८ चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने नाबाद २३ धावांची खेळी केली. भारताने सात वेळा तर श्रीलंकेने सहा वेळा हे विजेतेपद पटकावले होते. गेल्या वेळी भारताने २०१८ मध्ये आशिया चषक जिंकला होता आणि आता पाच वर्षांनंतर आठव्यांदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आशिया चषकावर नाव कोरले आहे.

Plane Crash News : पर्यटकांना घेऊन जाणारे विमान कोसळले; पायलटसह १४ प्रवाशांचा मृत्यू

तर मोहम्मद सिराजच्या भेदक माऱ्यापुढे श्रीलंकेच्या (Sri Lanka) फलंदाजांनी लोटांगण घातले. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने श्रीलंकेची पहिली विकेट घेत भारताला दमदार सुरुवात करुन दिली. त्यानंतर मोहम्मद सिराज याने एकापाठोपाठ एक सहा विकेट घेतल्या. तसेच सिराज याने एकाच षटकात चार विकेट घेण्याचा पराक्रमही यावेळी केला. तर हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) अखेरच्या तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आणि श्रीलंकेचा डाव अवघ्या ५० धावांवर आटोपला.

Nashik Rain News : नाशकात पावसाची जोरदार हजेरी

दरम्यान, भारताकडून मोहम्मद सिराजने ७ षटकात २१ धावा देत ६ बळी घेतले. तसेच हार्दिक पांड्याने २.२ षटकात ३ धावा देत ३ बळी घेतले. तर बुमराहने एक बळी घेत ५ षटकात २३ धावा दिल्या. श्रीलंकेकडून कुसल मेंडिसने सर्वाधिक १७ तर हेमंताने १३ धावा केल्या. मात्र, इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या देखील गाठता आली नाही. श्रीलंकेचे पाच फलंदाज शून्यावर बाद झाले. तर चार फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Accident News : पर्यटकांची कार दरीत कोसळून भीषण अपघात; तीन ठार, चार जण गंभीर जखमी

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या