कोलंबो । वृत्तसंस्था colombo
कोलंबो येथील प्रेमदास ( Premdasa ) मैदानावर खेळल्या गेलेल्या श्रीलंका आणि भारत ( Srilanka Vs India ) यांच्यातील टी-२० मालिकेत भारताने श्रीलंकेचा ३८ धावांनी पराभव केला .
श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने फलंदाजी करताना पृथ्वी शॉ आणि कर्णधार शिखर धवन यांनी डावाची सुरुवात केली. मात्र पहिलाच चेंडू घातक ठरला. गोलंदाज दुश्मंता चमीराने पृथ्वीला झेलबाद केले. पृथ्वी बाद झाल्यावर संजू सॅमसन मैदानात आला. त्याने धवनसोबत अर्धशतकी भागीदारी रचली. टीम इंडियाचे अर्धशतक झाल्यानंतर हसरंगाने सॅमसनला बाद केले . सॅमसनने २७ धावांची खेळी केली.
धवन-सूर्यकुमारने टीम इंडियाचे शतक फलकावर लावले. दोघांनी ३६ चेंडूत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. धवनने ४ चौकार आणि एका षटकारासह ४६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. सूर्यकुमारने ५ चौकार आणि २ षटकारांसह ५० धावांची खेळी केली.
सूर्यकुमार नंतर हार्दिक पंड्याने १२ चेंडूत १० धावा केल्या. इशान किशनने फटकेबाजी केल्यामुळे भारताला दीडशेचा पल्ला गाठता आला. इशान किशनने १४ चेंडूत २० धावांची उपयुक्त खेळी केली. भारतने श्रीलंकेपुढे १६५ धावांचे आव्हाना दिले .
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या टी २० सामन्यात भारताने ठेवलेल्या १६५ धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताने श्रीलंकेने धडाकेबाज सुरुवात केली. सलामीवीरअविष्का फर्नांडो आणि मिनोद भानुका यांनी २ षटकात २० धावा ठोकून काढल्या.
कृणाल पांड्याने भानुकाला १० धावांवर बाद करत श्रीलंकेला पहिला धक्का दिला. भानुका बाद झाल्यानंतर फर्नांडोने धनंजया डि सिल्वाच्या साथीने श्रीलंकेला ६ षटकात ४६ धावांपर्यंत पोहचवले. चहलने धनंजया डि सिल्वाला ९ धावांवर बाद केले. त्यानंतर पुढच्याच षटकात भुवनेश्वर कुमारने सलामीवीर फर्नांडोला २६ धावांवर माघारी पाठविले.
चरीथ असलंकाने दमदार फलंदाजी करत २५ चेंडूत ४४ धावांची खेळी केली. त्याने लंकेला शतकाजवळ पोहचवले. पांड्यानंतर १६ वे षटक टाकणाऱ्या दिपक चाहरने लंकेला मोठा धक्का देत असलंकाला ४४ धावांवर बाद केले. भुवनेश्वरने करुणारत्नेला ३ धावांवर तर चक्रवर्तीने शनकाला १६ धावांवर बाद केले.
लंकेचे ८ फलंदाज बाद झाल्याने त्यांची धावगती मंदावली. लंकेचा डाव १२६ धावात गुंडाळला.