Tuesday, November 26, 2024
Homeक्रीडाIND vs WI : वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेआधी भारताला मोठा धक्का;...

IND vs WI : वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेआधी भारताला मोठा धक्का; ‘हा’ खेळाडू अचानक परतला मायदेशी

मुंबई | Mumbai

भारत आणि वेस्टइंडिज (India and West Indies) यांच्यात आज पहिला वनडे सामना ( ODI Match) होणार असून या लढतीसाठी भारतीय संघ रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वाखाली मैदानात उतरण्यास सज्ज झाला आहे. परंतु, त्याअगोदर भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे…

- Advertisement -

Rain Update : राज्यात आज मुसळधार पाऊस कोसळणार; हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराजची (Mohammad Siraj) वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवड झाली होती. मात्र, त्याला संघ व्यवस्थापनाने अचानक विश्रांती देण्याचा निर्णय घेतल्याने तो मायदेशी परतला आहे.

Accident News : पुणे-नाशिक महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात

नुकत्याच वेस्ट इंडिजविरुद्ध पोर्ट ऑफ स्पेनमध्ये ड्रॉ झालेल्या कसोटीत सामन्यात मोहम्मद सिराजने विकेट घेतल्या होत्या. तसेच त्याला पहिल्यांदा कसोटीत (Test) ‘प्लेअर ऑफ द मॅच’ चा पुरस्कार देखील मिळाला होता. तर डॉमनिका कसोटीत त्याने २ विकेट घेतल्या होत्या. परंतु, संघ व्यवस्थापनाने त्याच्यावरील ताण कमी करण्यासाठी वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय मालिकेतून विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.

महायुतीचा राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा फॉर्म्युला ठरला; कुणाच्या वाट्याला किती जागा?

दरम्यान, मोहम्मद सिराज मायदेशी परतल्याने त्याच्या जागी पर्यायी खेळाडू म्हणून कुणाला संघात संधी द्यावी असा प्रश्न कर्णधार रोहित शर्मासमोर निर्माण झाला आहे. तर सिराजचा बदली खेळाडू म्हणून मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, शार्दूल ठाकूर, उमरान मलिक, हार्दिक पांड्या यापैकी एकाला संधी मिळू शकते.

सलिल परांजपे, नाशिक

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या