Tuesday, November 26, 2024
Homeदेश विदेशभारताच्या विकासदरात 5 टक्के घट – जागतिक बँक

भारताच्या विकासदरात 5 टक्के घट – जागतिक बँक

सार्वमत
नवी दिल्ली – कोरोनामुळे भारताच्या विकासदरात 5 टक्के घट होण्याची शक्यता असल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे.
जागतिक बँकेने ‘दक्षिण आशिया आर्थिक अपडेटः कोविड-19 चा परिणाम’ नावाचा अहवाल रविवारी प्रसिद्ध केला. कोरोनाच्या संकटामुळे भारतातील आर्थिक व्यवहार ठप्प होऊन जातील आणि भारताच्या आर्थिक विकासाचा वेग मंदावेल, अशी चिंता या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

जागतिक बँकेचे दक्षिण आशियातील मुख्य अर्थशास्त्रज्ञ हॅन्स टिम्मर यांनी हा अहवाल जारी करताना भारताची परिस्थिती चांगली नसल्याचे स्पष्ट शब्दांत नमूद केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होतील, असे जागतिक बँकेचे म्हणणे आहे. लॉकडाऊनमुळे लोकांचे येणे-जाणे आणि मालवाहतुकीवर बंदी आली आहे. त्याचा परिणाम देशांतर्गत मागणी आणि पुरवठ्याची साखळी छिन्न-विछिन्न होऊन जाईल आणि त्यामुळे आर्थिक विकासदर झपाट्याने कमी होईल, असे या अहवालात म्हटले आहे.

- Advertisement -

या संकटातून बाहेर पडण्यासाठी भारताने काय करायला हवे, याचे उत्तरही टिम्मर यांनी दिले आहे. युद्ध पातळीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखून प्रत्येकाला जेवण मिळेल, याची भारताने खबरदारी घ्यावी. अर्थव्यवस्था रूळावर आणण्यासाठी स्थानिक पातळीवर रोजगाराच्या उपलब्धतेच्या संधी निर्माण कराव्या आमि लघु आणि मध्यम उद्योग दिवाळखोरीत निघणार नाहीत, या दृष्टीने पावले उचलावीत, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान मागील आठवड्यात जागतिक बँकेने कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी भारताला एक अब्ज डॉलरचे आपत्कालीन अर्थसहाय देण्याची घोषणा केली होती. जास्तीत जास्त लोकांचे स्क्रीनिंग करून कोरोना संशयितांचा शोध घेण्यात यावा, त्यांच्यावर उपचार व्हावेत आणि पर्सनल प्रोटेक्टिव्ह किट्सची खरेदी करता यावी, यासाठी हे अर्थसहाय दिले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या