Saturday, March 29, 2025
Homeमुख्य बातम्याभारत सुपरपॉवर होण्याच्या मार्गावर- ग्रामविकासमंत्री महाजन

भारत सुपरपॉवर होण्याच्या मार्गावर- ग्रामविकासमंत्री महाजन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पंतप्रधान मोदींचे भाषण ऐकायला पहिल्याच दिवशी तिकीट फूल होत आहेत, लोकं ब्लॅकने तिकीट घेत असून हे शोभण्यासारखे आहे. असे गिरीश महाजन बोलताच सभागृहात हशा पिकला. आज चायनाही आपल्या नादी लागत नाही, नाहीतर पहिले बांगलादेश पण आपल्याला डोळे दाखवायचे. आज अमेरिकापण आपल्याला पायघड्या टाकत आहे, सुपरपॉवर होण्याच्या मार्गावर आपण आहोत, असे प्रतिपादन आज ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

- Advertisement -

महाजन काल मोदी 9 हे जनसंपर्क अभियानासाठी नाशिकला आले होते. शहर व्यापारी आघाडीच्या वतीने व्यापार्‍यांच्या संमेलनाचे आयोजन नाशिकच्या रावसाहेब थोरात सभागृहात करण्यात आले होते. यावेळी महाजन अध्यक्षस्थानी होते. मंचावर त्यांच्यासोबत शहरातील तीनही भाजप आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

महाजन म्हणाले, आज चीनही आपल्या नादी लागत नाही. आपण आजवर कधी ऐकले होते का? की मनमोहनसिंह गेले परदेशात आणि त्यांना तोफांची सलामी दिली, लोकं त्यांना बघायला रस्त्यांच्या दुतर्फ़ा उभे आहेत, त्यांचे भाषण ऐकायला ब्लॅकने तिकीट घेत आहेत, असे कधीच ऐकले नाही. मोदींच्या स्वागतासाठी केवढी तयारी होते आहे, किती गाजावाजा होतो, भाषण ऐकायला पहिल्याच दिवशी तिकीट फूल होत आहेत, लोकं ब्लॅकने तिकीट घेत आहेत. हे शोभण्यासारखे आहे.

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानानी मोदींना पायाला हात लावून नमस्कार केला, ती काय छोटी गोष्ट आहे का?.. मी 25 वर्षे आमदार आहे, पूर्वी आम्ही परदेशात जायचो तर लोकं आमच्याकडे बारीक डोळ्यांनी बघायचे आणि म्हणायचे, हे उधारीवाले येतात जातात. बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता, आज चायनाही आपल्या नादी लागत नाही, नाहीतर पहिले बांग्लादेश पण डोळे दाखवायचे. आज अमेरिका पण आपल्याला पायघड्या टाकत असून सुपरपॉवर होण्याच्या मार्गावर आपण असल्याचे ते म्हणाले.

बीआरएस पक्षामुळे फरक नाही

बीआरएस पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री केली असली व पैशांचा वापर ते करत असले तरीपण फार काही उपयोग होणार नाही. पुरोगामी महाराष्ट्रात मुरलेले लोकं आहेत. त्यांना यश मिळेल म्हणून त्यांना येथे आणण्यात आम्हाला रस नाही, असे ग्रामविकासमंंत्री गिरीश महाजन यांनी येथे स्पष्ट केले.

मंत्री महाजन काल नाशिक दौर्‍यावर आले होते. महाजनसंंपर्क अभियानाअंतर्गत त्यांनी व्यापारी बांधवांशी संवाद साधला. त्यानंतर ते पत्रकाराशी बोलत होते.

ते म्हणाले, वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबच्या कबरवर जात डोकं टेकवलें. प्रकाश आंबेडकर यांच्या या कृतीचे कुणीही समर्थन करू शकत नाही. हे फक्त मतांचे लांगुलचालन करण्यासाठी आहे. आता उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी. त्यांंचे या गोष्टीला समर्थन आहे का? स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिल्याने हे वाईट दिवस त्यांच्यावर आले आहेत. मंत्रिमंडळ विस्तार चर्चेवर ते म्हणाले, कोर्टाने निर्णय दिल्यापासून या चर्चा सुरू आहेत. दोन पक्ष असल्यामुळे नावांविषयी आणि खात्यांविषयी चर्चा होत असते. या सर्व चर्चा अंतिम टप्प्यात आले आहे. विस्ताराबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला जाऊन आले आहेत. चर्चा सुरू आहे. खाते आणि नावानुसार चर्चा सुरू आहे.

नऊ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यापारी, उद्योजक यांच्यासाठी अनेक निर्णय घेतले. एक खिडकी योजनेसारखे अनेक निर्णय घेण्यात आले. हे निर्णय लोकांसाठी यावे म्हणून हा कार्यक्रम घेतोय. मोदी सरकारचे काम पोहोचवण्यासाठी आम्ही मोदी 9 हा कार्यक्रम हाती घेतला आहे, असे ते म्हणाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या गांधीनगर जवळील विजय ममता चित्रपटगृहाजवळ ट्रॅक्टरची वाहतूक करणाऱ्या ट्रकची एका तरुणाला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक युवक...