नवी दिल्ली | New Delhi
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Dolad Trump) यांनी काल (शनिवारी) आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan War) यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीला विराम दिल्याचे म्हटले होते. त्यानंतर भारत सरकारने (India Government) देखील याबाबत अधिकृतपणे घोषणा केली. मात्र, अवघ्या काही तासांतच पाकिस्तानकडून जम्मू काश्मीरमधील काही भागांत गोळीबार करण्यात आला. त्यामुळे पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आल्याचे दिसून आले.
अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी (War) कराराबाबत ‘ट्रुथ सोशल’ वर एक पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये ट्रम्प यांनी (Donald Trump) आता काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही शेजारी देशांसोबत काम करण्याची ऑफर दिली आहे. केंद्र सरकारने काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, यावर भर दिला असून, तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीला विरोध केला आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांच्या ऑफरवर भारत सरकार काय प्रतिक्रिया देते? हे बघणे महत्वाचे असणार आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या अधिकृत एक्स ट्विटर हॅंडलवर लिहिले की, “मला भारत आणि पाकिस्तानच्या मजबूत आणि दृढ नेतृत्वाचा खूप अभिमान आहे. कारण त्यांच्याकडे समजून घेण्याची ताकद, शहाणपण आणि संयम आहे. सध्याच्या आक्रमकतेला थांबवण्याची वेळ आली आहे, त्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू आणि विनाश होऊ शकतो. लाखो चांगल्या आणि निष्पाप लोकांना मारले जाऊ शकते. तुमच्या धाडसी कृतींमुळे तुमचा वारसा खूप वाढला आहे. या ऐतिहासिक आणि शौर्यपूर्ण निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी अमेरिका तुम्हाला मदत करू शकली याचा, मला अभिमान आहे. जरी याबद्दल चर्चा झाली नसली तरी, मी या दोन्ही महान राष्ट्रांसोबत व्यापार लक्षणीयरीत्या वाढवणार आहे. शिवाय हजारो वर्षांनंतर काश्मीरबाबत तोडगा निघू शकतो का, हे पाहण्यासाठी मी तुम्हा दोघांसोबत काम करेन. भारत आणि पाकिस्तानच्या नेतृत्वाला चांगल्या कामासाठी देव आशीर्वाद देवो”, असे त्यांनी म्हटले आहे.
US President Donald Trump posts, "I am very proud of the strong and unwaveringly powerful leadership of India and Pakistan… I am proud that the USA was able to help you arrive at this historic and heroic decision. While not even discussed, I am going to increase trade… pic.twitter.com/SSHkoYcChD
— ANI (@ANI) May 11, 2025