Saturday, May 10, 2025
Homeब्रेकिंग न्यूजIndia Pakistan War : भारताच्या Operation Sindoor मध्ये मसूद अझहरच्या भावासह पाच...

India Pakistan War : भारताच्या Operation Sindoor मध्ये मसूद अझहरच्या भावासह पाच मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा

वाचा संपूर्ण यादी

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi 

जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पहलगाममध्ये (Pahalgam) २२ एप्रिल रोजी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भारताच्या (India) २६ निष्पाप पर्यटकांची हत्या केली होती. त्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. तसेच या हल्ल्याचा बदल घ्यावा अशी मागणी भारतातील नागरिकांकडून केली जात होती.

- Advertisement -

या हल्ल्यानंतर १५ व्या दिवशी भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे (Operation Sindoor)  एअर स्ट्राईक करत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे (Terrorists) ९ तळ उद्ध्वस्त केले. या हल्ल्यात पाकिस्तानचे अनेक दहशतवादी ठार झाले होते. त्यानंतर आता या हल्ल्यात पाच मोठे दहशतवादी मारले गेले असून, त्यांची नावे समोर आली आहेत. यामध्ये जैश प्रमुख मौलाना मसूद अझहर याचा मेहुणा आणि भावाचा समावेश आहे.

भारताच्या हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे पुढीलप्रमाणे

१) मुदस्सर खादियान खास उर्फ ​​मुदस्सर उर्फ ​​अबू जुंदाल

हा लष्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवादी असून त्याची अंत्ययात्रा एका सरकारी शाळेत झाली, त्याचे नेतृत्व जागतिक दहशतवादी असलेला जमात-ए-उद-दावाचा हाफिज अब्दुल रौफ याने केले. पाक लष्कराचे लेफ्टनंट जनरल आणि पंजाब पोलिसांचे आयजी त्याच्या अंत्ययात्रेत उपस्थित होते.

२) हाफिज मोहम्मद जमिल (जैश-ए-मोहम्मद)

जैश प्रमुख मौलाना मसूद अझहर याचा मोठा मेहुणा असलेला हाफिज जमिल बहावलपूरमधील ‘मर्कज सुब्हान अल्लाह’चा प्रमुख होता. तो युवकांच्या धर्मांधतेसाठी कट्टर प्रचार करत होता आणि जैशसाठी निधी गोळा करण्यात सक्रिय होता.

३) मोहम्मद युसूफ अझहर उर्फ ​​उस्ताद जी उर्फ ​​मोहम्मद सलीम उर्फ ​​घोसी साहब

हा देखील दहशतवादी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होता. तो मौलाना मसूद अझहरचा दुसरा मेहुणा होता. तो आयसी-८१४ अपहरण प्रकरणात फरार होता.

४) खालिद उर्फ ​​अबू आकाशा

हा दहशतवादी लष्कर-ए-तैयबाशी संबंधित होता. तो जम्मू आणि काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी होता आणि अफगाणिस्तानातून शस्त्रास्त्रांची तस्करी करत होता. त्याचे अंत्यसंस्कार फैसलाबादमध्ये झाले आणि त्यात वरिष्ठ पाकिस्तानी लष्करी अधिकारी, फैसलाबादचे उपायुक्त उपस्थित होते.

५) मोहम्मद हसन खान

हा दहशतवादी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होता. तो पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील जैशचा ऑपरेशनल कमांडर मुफ्ती असगर खान काश्मिरी याचा मुलगा होता. जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांचे समन्वय साधण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Vikram Gaikwad : सुप्रिसद्ध मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन

0
मुंबई । Mumbai प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं आज (१० मे, शनिवार) सकाळी निधन झालं. ते ६१ वर्षांचे होते. त्यांनी मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या...