Thursday, May 8, 2025
Homeब्रेकिंग न्यूजIndia Pakistan War : भारताने पाकिस्तानवर काय-काय कारवाई केली? परराष्ट्र मंत्रालयाने इशारा...

India Pakistan War : भारताने पाकिस्तानवर काय-काय कारवाई केली? परराष्ट्र मंत्रालयाने इशारा देत सगळचं सांगितलं

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi 

भारताने (India) बुधवार (दि. ७ मे) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पाकिस्तानात (Pakistan) घुसून एअर स्ट्राइक केला. त्यामध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केले. यानंतर काल रात्री पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर भारताच्या १५ शहरांवर हल्ला (Attack) करण्याचा प्रयत्न केला. पण भारताने त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. यानंतर भारताने आज पाकिस्तानच्या १२ शहरांमध्ये ५० ड्रोन हल्ले केले. भारताच्या या कारवाईची माहिती कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.

- Advertisement -

यावेळी विक्रम मिसरी म्हणाले की, “ऑपरेशन सिंदूरच्या (Operation Sindoor) माध्यमातून भारताने पाकिस्तानच्या कोणत्याही नागरी भागावर हल्ला केला नव्हता. पाकिस्तानने जर भारतावर हल्ला केला तर त्याला उत्तर देणार असे भारताने स्पष्ट केले होते. त्यानंतर काल रात्री पाकिस्तानने भारतातील अमृतसर,अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोटसह १५ शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. पण भारताने त्याला उत्तर देत तो हल्ला निष्क्रिय केला. यानंतर भारताने पाकिस्तानच्या काही ठिकाणच्या रडार यंत्रणा निष्क्रिय केल्या असून, त्यात लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टिमचा समावेश आहे”, असे त्यांनी म्हटले.

विंग कमांडर व्योमिका सिंग (Vyomika Singh) म्हणाल्या की,”पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पूंछ, मेंढर आणि राजौरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर मोर्टार आणि जड तोफखान्याचा वापर करून अकारण गोळीबाराची तीव्रता वाढवली आहे. पाकिस्तानी गोळीबारात तीन महिला आणि पाच मुलांसह १६ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पाकिस्तानकडून मोर्टार आणि तोफखान्याचा गोळीबार थांबवण्यासाठी भारताला प्रत्युत्तर द्यावे लागले. पाकिस्तानी सैन्याने त्याचा आदर केला तर भारतीय सशस्त्र दल तणाव न वाढवण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो”, असे त्यांनी म्हटले.

तसेच सोफिया कुरेशी (Sophia Qureshi) म्हणाल्या की, “ऑपरेशन सिंदूर ७ मे २०२५ ला झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान भारताने आपली प्रतिक्रिया केली होती. पाकिस्तानच्या लष्करी ठिकाणांवर हवाई हल्ला करण्यात आला नव्हता. फक्त दहशतवादी अड्डे नष्ट करण्यात आले होते हे पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले होते. सैन्याच्या ठिकाणांवर हल्ला केल्यास, शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यास भारताकडून प्रत्त्युत्तर दिले जाईल हे देखील सांगण्यात आले होते. उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्कराच्या ठिकाणांवर श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, बठिंडा, चंडीगड, नल, फलौदी, उत्तरलाई, अवंतीपुरा आणि भुज या लष्कराच्या ठिकाणांवर ड्रोन आणि मिसाईल्सद्वारे हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यावर भारताने वायुदलाने प्रत्त्युत्तर दिले. या हल्ल्यांचे अवशेष अनेक ठिकाणांहून सापडले. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याचा पुरावा हे अवशेष आहेत, असेही त्यांनी म्हटले.

पाकिस्तानी मंत्र्यांचे दहशतवाद्यांशी संबंध; परराष्ट्र सचिवांचा मोठा दावा

ऑपरेशन सिंदूरबद्दल परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी म्हणाले की, “पाकिस्तान जगभरात दहशतवादाचा चेहरा बनला आहे. तुम्हाला ओसामा बिन लादेन कुठे सापडला आणि त्याला कोणी शहीद म्हटले, हे आठवण करून देण्याची गरज नाही. पाकिस्तानमध्ये मोठ्या संख्येने संयुक्त राष्ट्रांनी नियुक्त केलेले आणि अनेक देशांनी प्रतिबंधित केलेले दहशतवादी आहेत. गेल्या काही दिवसांत, त्यांचे संरक्षण मंत्री आणि माजी परराष्ट्र मंत्री यांनी अशा दहशतवादी गटांशी त्यांचा देशाचा संबंध असल्याचे मान्य केले आहे”, असे त्यांनी म्हटले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

India Pakistan War : भारताच्या १५ शहरांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न; S...

0
नवी दिल्ली | New Delhi भारताने (India) बुधवार (दि. ७ मे) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पाकिस्तानात (Pakistan) घुसून एअर स्ट्राइक केला. त्यामध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त...