नवी दिल्ली | New Delhi
भारताने पहलगाम हल्ल्याला (Pahalgam Attack) प्रत्युत्तर देताना ‘ऑपरेशन सिंदूर’करत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये (Pakistan) मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, सातत्याने भारताच्या विविध भागांवर हल्ला करत आहे. गेले तीन पाकिस्तानी सेना दिवस भारतावर हल्ला करत आहे. मात्र, भारतीय सशस्त्र दल त्यांचे प्रयत्न हाणून पाडत आहे.
त्यातच काल (शुक्रवारी) ९ मे च्या रात्री पाकिस्तानने नेमके कुठे आणि कसे हल्ले केले? याबाबत परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालयाने संयुक्त पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यावेळी कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की, “पाकिस्तानने पहाटे १.४० वाजता पंजाबमधील हवाई तळांवर हल्ले केले. भारताच्या हवाई तळांवरील रुग्णालयांना लक्ष्य केले. पाकच्याही लष्करी तळांवरच आम्हीही हल्ले चढवले. सियालकोटचा हवाई तळ भारताने उद्ध्वस्त केले आहे. लाहोरमधून नागरी विमानांच्या आडून पाकने हल्ले केले आहेत”, असे त्यांनी म्हटले. तसेच पाकिस्तानने लष्करी तळांना लक्ष्य करुनही भारताने संयम राखला आहे, असेही सोफिया कुरेशी (Sofia qureshi) म्हणाल्या.
पुढे कुरेशी म्हणाल्या की,”पाकिस्तान सेनेने पश्चिम भागावर एकसारखे आक्रमण सुरू ठेवले. ड्रोन्स, लाँग रेज वेपन्स, लढाऊ विमानांचा वापर करत भारताच्या ढाच्याला लक्ष्य केले. पाकिस्ताने जाणूनबुजून हल्ला केल्यावर भारताने त्याला चोख प्रत्युत्तर दिले. तसेच टेक्निकली इन्स्टॉलेशन, कमांड अँड कंट्रोल सेंटर आणि रडार साईट्स हत्यार भंडारा निशाणा केले. रफिकी मुरीद, चकलाला, रहमियान खान, सुकुर आणि चुनिया पाकिस्तानच्या या ठिकाणी एअर लाँन्चद्वारे प्रतिहल्ला केला गेला. सियालकोटचा एअर बेसही टार्गेट केला. भारताने ही कारवाई करताना कमीत कमी नुकसान होईल याची खबरदारी घेतली होती”, असे त्यांनी म्हटले.
पाकिस्तानने २६ ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला
पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमा LOC वर श्रीनगरपासून नलियापर्यंत २६ ठिकाणांवर हवाई घुसखोरी करण्याचा प्रयत्न केले. भारतीय सशस्त्र दलाने यशस्वीपणे या हल्ल्याला परतावून लावले. तरीही वायुसेनेचे स्टेशन असलेल्या पठाणकोट, उधमपूर, आदमपूर आणि भटिंडा स्टेशनला नुकसान केले. पाकिस्तानने पंजाबच्या एअर बेस स्टेशनवर १ वाजून ४० मिनिटांनी हाय स्पीट मिसाईल टाकण्याचा प्रयत्नही केला. पाकिस्तानने श्रीनगर, अवंतीपूर आणि उदमपूरच्या वैद्यकीय सेवा केंद्र आणि शाळांवरही हल्ले केले. यामुळे सिव्हिल इन्फ्रा स्ट्रक्चरवर हल्ला करण्याचा बेजबाबदार वर्तन दिसून आले.
पाकिस्तान सीमेवर मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात – लष्कर
पाकिस्तान सीमेवर मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करत असून, भारतीय लष्कराचे एस ४०० आणि ब्रह्मोसचा साठा पूर्णपणे सुरक्षित आहे. भारताचे सर्व एअरबेस सुरक्षित असून, पाकिस्तानकडून करण्यात येत असलेले दावे पूर्णपणे खोटे आहेत. भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याचे बरेच नुकसान केले आहे. तसेच पाकिस्तान खोट्या बातम्या पसरवण्याचे काम करत असून, सिरसा, आदमपूर हवाई तळांना झालेल्या नुकसानीचे दावे पूर्णपणे खोटे आहेत”, असे परराष्ट्र सचिव म्हणाले. यावेळी एअरबेसचे फोटोदेखील पत्रकार परिषदेत दाखवण्यात आले. ज्यात ही सर्व ठिकाणं सुरक्षित असल्याचे दिसून येत आहेत.