नवी दिल्ली | New Delhi
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर राबविले. या हल्ल्यात भारताने पाकिस्तानमधील (Pakistan) दहशतवाद्यांचे ९ अड्डे उद्ध्वस्त केले. या हल्ल्यानंतर पाकिस्तान (India Pakistan War) बिथरला आहे.
त्यातच काल (गुरुवारी) भारतात पाकिस्तानने ड्रोन्स आणि मिसाइल्सच्या मदतीने हल्ले केले. या हल्ल्यांना निष्फळ करण्याचे काम भारतीय सैन्याने केले. यानंतर पाकिस्तानात हवाई हल्ले सुरू केले. या घडामोडींची माहिती आज परराष्ट्र खात्याच्या कर्नल सोफिया कुरेशी (Sophia Qureshi) विंग कमांडर व्योमिका सिंह (Vyomika Singh) आणि सचिव विक्रम मिस्त्री (Vikarm Mistry) यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. यावेळी त्यांनी पाकिस्तानचा रडीचा डाव उघडा पाडला.
यावेळी कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की,”पाकिस्तानी सैन्याने (Pakistani Army) ८ आणि ९ मेच्या रात्री हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानकडून सीमा परिसरात जोरदार गोळीबार (Firing) करण्यात आला. तसेच घुसखोरीही करण्यात आली. यावर भारताने चोख प्रत्युत्तर दिले. यासोबत भारतीय सैन्याने पाकिस्तानचे ड्रोनही पाडले. या ड्रोनचा उद्देश गुप्त माहिती गोळा करणे हा होता. हे ड्रोन तुर्कीमध्ये बनलेले होते. पाकिस्तानने ३६ ठिकाणांवर ३०० ते ४०० ड्रोन्सने हल्ल्याचा प्रयत्न केला. यानंतर भारताने चार ड्रोन्सच्या मदतीने प्रति हल्ला करत त्यांचा हा डाव हाणून पाडला”, असे त्यांनी म्हटले.
तसेच पाकिस्तानने पुंछ, मेंढर यांसारख्या अनेक सेक्टरमध्ये ड्रोन पाठण्यात आले. याशिवाय गोळीबारही करण्यात आला. पाकिस्तानकडून भारतीय लष्कर ठिकाणे आणि नागरी वस्तीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पंजाबमधील भठिंडा एअरबेसला निशाणा बनवण्यात आले. या ड्रोनची फॉरेन्सिक तपासणी होणार आहे. पाकिस्तानी सैन्याने अनेक वेळा भारतीय हवाई हद्दीचे उल्लंघन केले. पाकिस्तानी हल्ल्यात भारताचे (India) अनेक जवान शहीद झाले आहेत”, असेही कर्नल सोफिया कुरेशी यांनी म्हटले.
पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री म्हणाले की, “पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढालीसारखा वापर केला जात आहे. पाकिस्तानने काल भारताची हवाई हद्द पार केली. भारताने नागरी विमानांवर हल्ला न करता संयम बाळगला. पाकिस्तानच्या गोळीबारात अनेक स्थानिकांचा मृत्यू झाला आहे. भारतीय सैन्याने अत्यंत जबाबदारीने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानमधील एक रडार उद्धवस्त करण्यात भारताला यश मिळाले”, असे त्यांनी म्हटले.
पाकिस्तानकडून धार्मिक ठिकाणे लक्ष्य
पाकिस्तानने एका ख्रिश्चन शाळेला (Christian School) आणि गुरुद्वाराला लक्ष्य केले. ख्रिश्चन शाळेवर केलेल्या हल्ल्यामध्ये दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती यावेळी परराष्ट्र खात्याकडून देण्यात आली.