मुंबई | Mumbai
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान चांगलाच बिथरल्याचे पाहायला मिळत आहे. भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी (Terrorist) तळांवर हल्ले केल्यानंतर पाकिस्तानने (Pakistan) सीमारेषेवर गोळीबार सुरू केला आहे. भारतीय सैन्य दलानेही या गोळीबाराला चोख प्रत्त्युत्तर दिले असून पाकिस्तानी रेंजर्सना तडाखा दिला आहे. सीमारेषेवर तणाव पाहायला मिळत असून चकमक अद्यापही सुरुच आहे.
अशातच आता पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये केलेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय सैन्य (Indian Army) दलाचे दोन जवान शहीद (Martyred) झाले आहेत. यामध्ये मूळचे आंध्र प्रदेशचे आणि सध्या मुंबईतील घाटकोपर येथील कामराज नगरच्या झोपडपट्टीमध्ये राहत असलेले मुरली नाईक यांना वीरमरण आले आहे. काही दिवसांपूर्वी सदरची झोपडपट्टी पुनर्विकासात गेल्याने त्यांची घरे तोडण्यात आली आहेत. त्यामुळे, सध्या नाईक यांचे कुटुंब आंध्र प्रदेशाला राहण्यास गेले आहे.
"I am deeply saddened to learn that Army Jawan M. Murali Naik of Kalli Thanda village in Gaddamthanda panchayat of Gorantla mandal in Sri Satya Sai district was martyred in the ongoing Operation Sindoor in Jammu and Kashmir on Wednesday," posts Andhra Pradesh Governor S Abdul… pic.twitter.com/6tF5OKRrNW
— Press Trust of India (@PTI_News) May 9, 2025
दरम्यान, शहीद एम मुरली नाईक (M Murli Naik) यांना आंध्र प्रदेशच्या राज्यपालांनी श्रद्धांजली वाहिली आहे.राजभवनाच्या अधिकृत एक्स हँडलवर पोस्टद्वारे त्यांनी शोक व्यक्त केला आहे. तर मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ट्वविट करुन शहीद जवान मुरली नाईक यांना श्रद्धांजली अर्पण केली असून,नाईक कुटुंबीयांप्रती सहवेदना आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच वाएसआर काँग्रेसचे नेते वाय एस जगनमोहन रेड्डी यांनीही शहीद जवान एम मुरली नाईक यांच्याप्रति शोक व्यक्त केला आहे.