Thursday, May 8, 2025
Homeदेश विदेशIndia Pakistan War : भारताने लाहोरमध्ये घुसून केली पाकिस्तानची रडार यंत्रणा उद्ध्वस्त;...

India Pakistan War : भारताने लाहोरमध्ये घुसून केली पाकिस्तानची रडार यंत्रणा उद्ध्वस्त; ड्रोन हल्ल्यांचा धडाका

नवी दिल्ली | New Delhi

भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील तणाव दिवसागणिक वाढत आहे. ऑपरेशन सिंदूर राबवत भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतर पाकिस्तानकडून प्रत्युत्तरादाखल कारवाईची धमक्या दिल्या जात आहेत. भारतीय सैन्याने केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation Sindoor) पाकिस्तानमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. त्यातच पाकिस्तानी सैन्याने भारतातील अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

पाकिस्तानने पंजाब, गुजरात आणि राजस्थानमधील भारतीय लष्कराच्या तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे भारतीय वायूदलाने ड्रोनचा वापर करुन लाहोरमधील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम आणि रडार यंत्रणा उद्ध्वस्त (Pakistan Air Defence Radars And Systems Destroyed) केली आहे. पाकिस्तान भारतावर मोठा हल्ला करण्याच्या प्रयत्नात होता. हा हल्ला उधळून लावण्यासाठी भारताने ड्रोन हल्ला करुन पाकिस्तानची HQ-9 रडार यंत्रणा उद्ध्वस्त केली, अशी माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली.

पाकिस्तानने भारतीय लष्कराचे (Indian Army) अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज या १५ ठिकाणी असलेले तळ लक्ष करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी ड्रोन आणि मिसाईलचा वापर केला. मात्र, भारतीय लष्कराने पाकिस्तानचा हा प्रयत्न हाणून पाडला. पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्यांचे प्रयत्न निष्प्रभ केल्यानंतर भारताने पुरावे ताब्यात घेतलेले आहेत.

केंद्र सरकारने (Central Government) एक अधिकृत पत्रक जारी करत सगळ्या घडामोडींची आणि भारतीय सैन्यानं केलेल्या कारवाईची माहिती दिली आहे. ‘आज सकाळी भारताच्या सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील अनेक ठिकाणांवरील हवाई सुरक्षा यंत्रणा आणि रडार यांना लक्ष्य केले. भारताने पाकिस्तानला त्यांच्याच पद्धतीने उत्तर दिले आहे. लाहोरमधील एक हवाई सुरक्षा यंत्रणा उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे,’ अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आलेली आहे.

तसेच आज ८ मे २०२५ रोजी पहाटे पाकिस्तानातील अनेक हवाई संरक्षण रडार आणि यंत्रणांवर हल्ले करण्यात आले, यामध्ये लाहोर येथील एक हवाई संरक्षण यंत्रणा पूर्णपणे निष्क्रिय करण्यात आली. पाकिस्तानने (Pakistan) लाहोर आणि इस्लामाबाद विमानतळांवरील उड्डाणे तात्पुरती बंद केली. तसेच, लाहोरमध्ये ८ मे रोजी सकाळी स्फोटांचा आवाज ऐकू आला, असे स्थानिक प्रसारमाध्यमांनी नोंदवले.

भारताने पाकिस्तानची HQ-9 एअर डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त

पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टम आणि संरक्षण क्षेपणास्त्र प्रक्षेपकांच मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानला चीनकडून HQ-9 एअर डिफेन्स सिस्टीम मिळाली आहे. ही सिस्टीम जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. चायना प्रिसिजन मशिनरी इम्पोर्ट-एक्सपोर्ट कॉर्पोरेशनने (सीपीएमआयईसी) ही प्रणाली विकसित केली. पाकिस्तानने २०२१ मध्ये ही यंत्रणा आपल्या लष्करात समाविष्ट केली होती. राफेल, सुखोई आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्रांसारख्या भारताच्या हवाई धोक्याला तोंड देण्यासाठी पाकिस्ताननं चिनी वस्तूंवर अवलंबून राहण्याचा निर्णय घेतला. परंतु आता त्याचं पितळ उघडं पडलं आहे. याची रेंज १२५ ते २०० किलोमीटरपर्यंत असल्याचं सांगितले जाते. यात एकाच वेळी १०० टार्गेट्स ट्रॅक करण्याची क्षमता आहे.

 

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Pakistan Blast : पाकिस्तान हादरलं; कराचीसह १२ ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट

0
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi  भारतीय सैन्याने केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये (Pakistan) सध्या भीतीचे वातावरण आहे. भारताने (India) पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील ९...