नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पहलगाममध्ये (Pahalgam) २२ एप्रिल रोजी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भारताच्या (India) २६ निष्पाप पर्यटकांची हत्या केली होती. यानंतर या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.
परंतु, पाकिस्तानचे (Pakistan) हवाई हल्ले भारताने हाणून पाडले. भारताच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केली. त्यामुळे आता पाकिस्तानचा सूर बदलतांना दिसत आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक डार (Ishaq Dar) यांनी पाकिस्तानातील जियो न्यूजला (Jeo News) दिलेल्या मुलाखतीत या संदर्भात महत्त्वाचे विधान केले आहे.
यावेळी ते म्हणाले की, “आम्ही भारताला (India) प्रत्युत्तर दिले कारण आमचा संयम संपला होता. आम्हाला विनाश नको, आम्हाला निधीचा अपव्यय नको. पाकिस्तानला नेहमीच शांतता हवी होती. जर भारताने या क्षणी थांबले तर आम्हीही शांततेचा विचार करू आणि बदला घेणार नाही किंवा काहीही करणार नाही. आम्हाला युद्ध नको, खरोखर शांतता हवी आहे”, असे इशाक डार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भारतीय सैन्याच्या (Indian Army) ऑपरेशन सिंदूरला (Operation Sindoor) उत्तर देण्यासाठी पाकिस्तानने ऑपरेशन बुन्यान-उन-मर्सूस सुरु केले आहे. या ऑपरेशनच्या अंतर्गत पाकिस्तानने भारताच्या उधमपूर, पठाणकोट, भटिंडा, भुजमधील हवाई तळांना लक्ष्य केले. पण पाकिस्तानच्या क्षेपणास्त्रांना भारतीय हवाई दलांना हवेतच नष्ट केले. पाकिस्तानकडून हाय स्पीड मिसाईल्सचा वापर करण्यात आला होता. पण ही क्षेपणास्त्रं भारताच्या हवाई सुरक्षा यंत्रणांनी हाणून पाडली. या हल्ल्यांमुळे भारतीय हवाई दलाच्या तळांचे नुकसान झालेले आहे.
अमेरिकला पण दिला निरोप
तसेच या मुलाखतीत बोलतांना इशाक डार यांनी म्हटले की, “अमेरिकन परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी बोलताना पाकिस्तानची भूमिका त्यांच्यासमोर मांडली”, असे ते म्हणाले. रूबियो यांनी अगोदर भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांच्याशी संवाद साधला आणि नंतर डार यांच्याशी हॉटलाईनवर चर्चा केली.