नवी दिल्ली | New Delhi
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांची तळे उद्ध्वस्त केली. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्या लष्करी संघर्षाच्या ठिणग्या उडू लागल्या आहेत. भारताच्या दहशतवाद्यांविरोधातील लष्करी कारवाईने पाकिस्तानची भंबेरी उडाली आहे. तर पाकिस्तानने भारतीय लष्कराच्या तळांना लक्ष्य करण्याचे अपयशी प्रयत्न केले. मात्र, तिथेही पाकिस्तानची फजिती झाली. यानंतर आता पाकिस्तानची अवस्था बिकट झालेली दिसत आहे.
अगोदरच पाकिस्तानची अर्थव्यवस्था (Pakistan) रसातळाला गेली असताना पाकने भारताशी युद्ध करण्याचे साहस केले होते. पाकिस्तानने गुरुवारी भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रं आणि ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने (Air Defence) हे सर्व हल्ले परतावून लावले होते. तसेच भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये घुसून ड्रोन हल्ले (Drone Attack) केले होते. तर भारतीय नौदलाच्या युद्धनौकांनी पाकिस्तानचे व्यापारी केंद्र असलेले कराची बंदर उद्धवस्त केले होते.
दरम्यान, या एका हल्ल्यानेच अगोदरच कंगाल असलेल्या पाकिस्तानचे कंबरडे पार मोडले आहे. त्यामुळे पाकिस्ताने आता जगातील अन्य देशांकडे (Country) आर्थिक मदतीसाठी (Help) कटोरा पुढे केला आहे. पाकिस्तानच्या अर्थविभागाने यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्यामध्ये पाकिस्तानने आपल्या आंतरराष्ट्रीय भागीदारांकडे आर्थिक मदतीची याचना केली आहे.
आम्हाला कर्ज द्या, तणाव कमी करण्यासाठी मदत करा
‘शत्रूने प्रचंड नुकसान केल्याने पाकिस्तान सरकारने आंतरराष्ट्रीय सहकाऱ्यांना (देश) अधिक कर्ज देण्याचे आवाहन केले आहे. वाढत चाललेले युद्ध आणि शेअर बाजार कोसळत असून, हा तणाव कमी करण्यासाठी मदत करण्याचे आम्ही आंतरराष्ट्रीय भागीदार देशांना आवाहन करतो, अशी ही पोस्ट होती. पाकिस्तानातील एका महत्त्वाच्या खात्याच्या एक्स अकाऊंटवरून तणाव वाढलेला असताना केलेली ही पोस्ट चर्चेचा विषय ठरली. त्यानंतर पाकिस्तान सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने याबद्दल अधिकृत खुलासा केला.
पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची स्थिती कशी आहे?
पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या एका छिद्र पडलेल्या बोटीसारखी आहे, जी कधीही बुडू शकते. ३५० अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था असलेला हा देश २०२३ मध्ये दिवाळखोरीतून थोडक्यात बचावला. त्याचे कर्ज-जीडीपी प्रमाण ७०% च्या जवळपास आहे आणि सरकारच्या उत्पन्नापैकी अर्धा भाग व्याज भरण्यात खर्च होतो. १३० अब्ज डॉलर्सचे परकीय कर्ज, ज्यापैकी बहुतेक कर्ज पुढील दोन वर्षांत फेडायचे आहे, हे पाकिस्तानसाठी एक मोठे आव्हान आहे. कोविड-१९, लष्करी राजवट, चुकीची धोरणे आणि दहशतवादाला प्रोत्साहन देण्याच्या धोरणामुळे पाकिस्तानच्या आर्थिक अडचणीत आणखी भर पडली.
ते अकाऊंट हॅक झाले आहे – पाकिस्तान
पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या फॅक्ट चेकर अकाऊंटवरून याबद्दल माहिती देण्यात आली. सरकारच्या आर्थिक व्यवहार मंत्रालयाचे एक्स अकाऊंट हॅक करण्यात आले आहे, असे सांगण्यात आले.