नवी दिल्ली | New Delhi
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर राबविले. या हल्ल्यात भारताने पाकिस्तानमधील (Pakistan) दहशतवाद्यांचे ९ अड्डे उद्ध्वस्त केले. भारताच्या या हल्ल्यनंतर पाकिस्तान पुरता गोंधळून गेला असून, सातत्याने भारतावर (India) हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, भारताच्या ऑपरेशन सिंदूरचा धसका पाकिस्तानने चांगलाच घेतला असून, त्याचे पडसाद पाकिस्तानच्या संसदेत देखील उमटत आहेत.
पाकिस्तानमधील इम्रान खान (Imran Khan) यांच्या पीटीआय पक्षाचे खासदार शाहिद अहमद (MP Shahid Ahmed) यांनी संसदेत पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना झापत त्यांच्या सरकारविरुद्ध रोष व्यक्त केला आहे. ते म्हणाले की,”आमचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे नाव घेण्यास घाबरत असून, ते घाबरट आहेत”, असे त्यांनी म्हटले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असताना पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या भूमिकेवर त्यांच्याच देशातील नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
पुढे बोलतांना शाहिद अहमद म्हणाले की, “मला टिपू सुलतान यांचे एक वाक्य आठवते. एका लष्करात सिंह असले आणि त्याच्यासोबत कोल्हे असतील तरी ते सिंहासारखे लढतात. परंतु सिंहाचा सरदार कोल्हा असेल तर ते सिंहासारखे लढू शकत नाही. ते युद्धात पराभूत (Defeated) होतात. तुमचे नेतृत्व घाबरणारा असेल तर काहीच करु शकत नाही”, असेही त्यांनी म्हटले.
खासदार उल-रहमान यांचाही हल्लाबोल
पाकिस्तानमधील जमियत उलमा इस्लाम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार फजल उल-रहमान यांनी देखील संसदेत बोलताना शाहबाज शरीफ यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, “देश युद्धाच्या उंबरठ्यावर असून आज संसदेत कोणीही जबाबदारी व्यक्ती नाही. म्हणून मी देखील संसदेतून बाहेर पडत आहे, असे त्यांनी म्हटले होते.