नवी दिल्ली | New Delhi
भारताने (India) पहलगाम हल्ल्याच्या विरोधात पुकारलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये (India vs Pakistan) तणाव विकोपाला गेला होता. दोन्ही देशातील तणाव निवळावा यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर आज दोन्ही देशांनी तात्काळ शस्त्रबंदी करण्याचा निर्णय घेतल्याने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबले आहे. याबद्दलची घोषणा भारत सरकारचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. यानंतर तिन्ही दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची सविस्तर माहिती दिली.
यावेळी ते म्हणाले की, “भारताने काही अटी घालत पाकिस्तानसोबत युद्ध थांबविण्यास मान्यता दिली आहे. दोन्ही देशांकडून ५ वाजेपासून शस्त्रबंदी थांबविण्यात आली असून, याबाबतच्या सूचना भारताच्या तीनही दलांना देण्यात आल्या आहेत. भारताच्या कारवाईत पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले असून, १२ मे ला पुन्हा दोन्ही देशातील DGMO मध्ये चर्चा होणार आहे”, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
तसेच “पाकिस्तानकडून भारताचे एस ४०० पाडल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच जेएस १७ ब्रह्मोस पाडल्याचा दावा देखील पाकिस्तान कडून करण्यात आला होता. मात्र, त्यांचे हे दोन्ही दावे खोटे आहेत. धार्मिक स्थळांवर भारताकडून कोणतेही हल्ले करण्यात आलेले नाहीत. परंतु, पाकिस्तानकडून याबाबत खोटा प्रचार करण्यात आला. भारताचे सगळे लष्करी तळ, लष्करी साहित्य सुरक्षित असून, भारतीय सेना सदैव सुरक्षा करण्यास सक्षम आहे,” असेही वरिष्ठ अधिकारी म्हणाले.