नवी दिल्ली | New Delhi
जम्मू -काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याच्या विरोधात भारताने पुकारलेले ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला असून दोन्ही देशांकडून हल्ले प्रतिहल्ले सुरु आहेत. पाकिस्तानने गुरुवारी आणि शुक्रवारी भारतावर ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला. पाकच्या प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्यूत्तर देत त्यांचा हा डाव भारतीय सैन्याने हाणून पाडला.
भारताच्या एस ४०० या विमानाने पाकिस्तानची ड्रोन, मिसाईल आणि लढाऊ विमाने पाडलीत. शुक्रवारीही पाकिस्तानने ३६ ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताने हे सर्व हल्ले निष्फळ ठरवले. पंरतु, आता भारत आणि पाकिस्तानने पूर्णपणे तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्सवर पोस्ट करत केला आहे.
— Donald J. Trump (@realDonaldTrump) May 10, 2025
डोनाल्ड ट्रम्प पोस्टमध्ये काय म्हणाले?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हणाले की, “भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्रीच्या दीर्घ वाटाघाटींनंतर, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. दोन्ही देशांचे अभिनंदन.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार म्हणाले की,”पाकिस्तान आणि भारत यांनी तात्काळ शस्त्रसंधीवर सहमती दर्शविली आहे. पाकिस्तानने नेहमीच त्यांच्या सार्वभौमत्वाशी आणि प्रादेशिक अखंडतेशी तडजोड न करता, या प्रदेशात शांतता आणि सुरक्षिततेसाठी प्रयत्न केले आहेत”, असे त्यांनी म्हटले.
५ वाजेपासून दोन्ही देशांत शस्त्रबंदी
भारतीय परराष्ट्र खात्याचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सायंकाळी ५ वाजेपासून दोन्ही देशांत शस्त्रबंदी करण्यात आली आहे. तसेच भारताने आपल्या हद्दीतून युद्धविराम केला आहे, असे त्यांनी म्हटले.
भारत-पाकिस्तान के बीच शाम 5 बजे से सीज़फ़ायर लागू, विदेश सचिव @VikramMisri ने दी जानकारी @MEAIndia #operation_sindoor #OperationSindoor #IndiaPakistanTensions #IndiaPakistan #IndianAirForce #IndianArmy #IndianArmedForces pic.twitter.com/1cQxzENrWB
— डीडी न्यूज़ (@DDNewsHindi) May 10, 2025